30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजशिर्डीत विश्वस्त मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय

शिर्डीत विश्वस्त मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय

टीम लय भारी

शिर्डी:- शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. कोविड संसर्गामुळे गेल्या 22 महिन्यांपासून बंद असलेला द्वारकामाई मंदिराचा दक्षिण दरवाजा भाविकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे देश-विदेशातील लाखो भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.( Shirdi  Trustees Board important decision was taken)

द्वारकामाईत दर्शनासाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरू करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी मध्यान्ह आरतीनंतर दरवाजा उघडून भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

मंदीरे उघडली, अन् भाजपचा ढोंगी चेहरा चव्हाट्यावर आला

लॉकडाऊननंतर अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर प्रथमच उघडले; दर्शनसाठी भाविकांची गर्दी

तर महाराष्ट्रातील मंदिरं पुन्हा बंद होऊ शकतात; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांकडून इशारा

PM to inaugurate new Circuit House near Somnath Temple

कोरोनामुळे 17 मार्च 2020 रोजी शिर्डी बंद करण्यात आली होती. त्यानंतर मंदिर उघडण्यात आले. मात्र, सरकारने अटी घातल्या आहेत. मंदिराला प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असावे. त्यानुसार साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेताना द्वारकामाई मंदिरात दर्शनासाठी वेगळी रांग लागू नये, यासाठी मुख्य दर्शन रांगेतूनच भाविकांना द्वारकामाईचे दर्शन देण्यात यावे.

याआधीही दोनदा टाळे ठोकण्यात आले आहे. त्यानंतर साईबाबांचे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आल्यावर दक्षिण बाजूच्या दरवाजातून थेट द्वारकामाई मंदिरात जावे, अशी मागणी साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांकडून वारंवार होत होती.

नुकतेच संस्थेचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे आणि विश्वस्त मंडळाने एकमताने द्वारकामाईचे स्वतंत्र मंदिर बनवून त्याचे स्वतंत्र दर्शन घेण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दरवाजा उघडला आणि वेगळ्या रांगेचा मार्ग मोकळा झाला. आता भाविकांनी सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोर पालन करून द्वारकामाई मंदिरात दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी