32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजउदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर निशाणा, पण शशिकांत शिंदेच्या आडून

उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर निशाणा, पण शशिकांत शिंदेच्या आडून

लय भारी न्यूज नेटवर्क

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार असताना आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहिले नव्हते याची छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मतना आजही सल आहे. मनांतील ही वेदना त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली आहे. उदयनराजेंनी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा नामोल्लेख टाळला आहे. पण शशिकांत शिंदे यांच्या आडून त्यांनी शिवेंद्रसिंहराजेवर निशाणा साधल्याची चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे.

‘दोन दिवसांपूर्वी छातीचा कोट करा म्हणणारे वाढदिवसाला आले नाहीत. त्यांनी त्यावेळी छातीचा कोट केला की, कोटाची छाती केली.’ असे या पत्रकात म्हटले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला जाऊ नये यासाठी कटकारस्थान रचणाऱ्या बाबींवरही पत्रकात जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात एकत्र येऊन शुभेच्छा देऊन गेले होते. पण सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकही आमदार आले नव्हते. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाईचे आमदार मकरंद पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण,  विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाढदिवस सोहळ्याकडे पाठ फिरविली होती.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी जुन्या दुखण्यावरची खपली काढली. पण महाराजांनी ही जुनी आठवण नक्की काढली. शिंदे यांच्या आडून त्यांनी कुणावर निशाणा साधला आहे, हे सुद्धा महाराजांनी सोप्या पद्धतीने जनतेला सांगावे अशी चर्चा साताऱ्याच्या चौका चौकांत रंगली आहे.

वाढदिवस सोहळ्याला राष्ट्रवादीच्या अन्य आमदारांबरोबरच शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सुद्धा आले नव्हते. अर्धवट माहिती वर आधारित ही पत्रकबाजी नक्की कोणी केली आहे. महाराजांचा या पत्रकाशी संबंध आहे किंवा नाही. महाराजांच्या नावाने भलत्याच व्यक्तीने अर्थलाभाच्या दृष्टीने तर ही पत्रकबाजी केली नाही ना अशी चर्चा रंगली आहे. वाढदिवसाला राष्ट्रवादीसह तत्कालीन काही काँग्रेस व भाजपचे नेते सुद्धा उपस्थित राहिले नव्हते.

संसदेत टोल नाका चालविण्यासाठी घ्यायला जायचे नाही अशी बोचरी टीका वाईमध्ये झाली होती. अशी टीका करणाऱ्यांविरोधात पत्रकबाजीचे धाडस का होत नाही. अशी उलटसुलट चर्चा साताऱ्यात रंगली आहे. पत्रक काढणाऱ्या सूत्रधाराचा छडा लागेपर्यंत तरी पत्रकाविषयी अनेक अर्थ रंगविले जातील एवढे मात्र खरे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी