30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजउध्दव ठाकरेंचा 'लोकप्रिय मुंख्यमंत्री'च्या यादीत समावेश!

उध्दव ठाकरेंचा ‘लोकप्रिय मुंख्यमंत्री’च्या यादीत समावेश!

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे कोणताही अनुभव नसताना थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. प्रशासनाचा अनुभव नसताना त्यांच्यावर टीका झाली. सत्तासांभाळली आणि कोरोनाचं संकट आलं. परंतु या परिस्थितीत चांगली कामगिरी केल्याबद्दल चांगलीच लोकप्रियता मिळवली असं एका सर्वेक्षणातून समोर आलं.

सी व्होरटने एका सर्व्हे केला. त्यामध्ये लोकप्रिय मुख्यंत्र्यांच्या यादीत ओडीशाचे नवीन पटनायक पहिल्याक क्रमांकावर आहेत. त्यांची लोकप्रियता  83 टक्के आहे. छत्तीसगडचे भूपेश बगेल (81%), केरळचे पिनरायी विजयन (80%), आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी (78%), तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पाचव्या स्थानी आहेत (76%) आहेत. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा क्रमांक लागतो. त्यांची लोकप्रियता जवळपास 74% टक्के आहे.  विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या सहा नावांमध्ये एकही मुख्यमंत्री भाजपचा नाही. विशेष म्हणजे अतिशय कमी लोकप्रिय असलेल्या यादीत हरयाणाचे मनोहर लाल खट्टर पहिल्या स्थानी आहेत. याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी