राजकीयमहाराष्ट्रमुंबई

गुणरत्न सदावर्ते हे गुणी बाळ आहेत त्यांच्याबाबत काय बोलणार ? : उदयनराजे भोसले

गुणरत्न सदावर्ते यांनी दोन वर्षापूर्वी साताऱ्यामध्ये राज्यसभा खासदार उदयनराजे (Udayan Raje) यांना एकेरी भाषेत बोलले होते. त्यावर उदयनराजे यांनी गुणरत्न सदावर्ते हे गुणी बाळ आहे असा टोला लगावला आहे. सदावर्ते यांनी विचार करुन बोलावं. पुढील परिणामांची तयारी ठेवा असा ईशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

टीम लय भारी

सातारा : गुणरत्न सदावर्ते यांनी दोन वर्षापूर्वी साताऱ्यामध्ये राज्यसभा खासदार उदयनराजे (Udayan Raje) यांना एकेरी भाषेत बोलले होते. त्यावर उदयनराजे यांनी गुणरत्न सदावर्ते हे गुणी बाळ आहे असा टोला लगावला आहे. सदावर्ते यांनी विचार करुन बोलावं. पुढील परिणामांची तयारी ठेवा असा ईशारा उदयनराजे यांनी दिला आहे. (Udayan Raje criticizes Gunaratna Sadavarte)

गुणरत्न सदावर्ते हे गुणी बाळ आहेत त्यांच्याबाबत काय बोलणार ? : उदयनराजे भोसले

जेव्हा आपण एक बोटं लोकांकडे दाखवतो तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात. त्यामुळे सदावर्ते यांनी जबाबदारीने शब्दांचा वापर करावा. लोकशाहीमध्ये फ्रिडम ऑफ स्पीच टू एक्सप्रेशन हे कॉन्स्टिट्यूशन राईट आहे हे जरी असलं तरी कोणी कायपण बोलावं हे चूकीचे आहे. हे त्यांना लागू होतं त्याचप्रमाणे मलासुद्धा लागू होतं. प्रत्येकाला स्वाभिमान हा आहेच. जर असं चूकीचं जर सदावर्ते बोलतं राहिले आणि परस्पर जर समजा कोणी काही केलं तर त्याला जबाबदार मी नसेन.ही धमकी नाही तर अॅक्शनला रीबॉण्ड होते, असे उदयनराजे (Udayan Raje) म्हणाले.

सध्या चॅनलवर माकड उड्या सुरु आहेत

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर भाष्य केलं आहे. मला टॉम अ‍ॅण्ड जेरी हे चॅनल आवडत पन मी सध्या ते सुद्धा बघायचं बंद करुन सध्या सुरु असलेल्या माकड उड्या बघत बसतो, असं उदयनराजे भोसले म्हणाले. एखाद्याने कुठल्यातरी काय केलं असेल मग ईडी असेल, सीआयडी , सीबीआय असेल ह्या ज्या काही एजंन्सी असतील ह्यांनी त्याबाबतीत सखोल चौकशी करावी आणि कुठलंकरी निर्णय दिला पाहिजे. सध्या राज्यात सुरु असणारे राजकारणाबाबत जशी माझी मानसिकता आहे तशीच या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे मानसिकता आहे. राज्यात काय सुरु आहे हो कोणालाच समजत नाही, असे उदयनराजे (Udayan Raje) म्हणाले.


हे सुद्धा वाचा : 

 

दिल्लीत उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण!

उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर खोचक टिका

मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

उदयनराजेंचे ट्विट पाहिलंत का? “आमचे बंधूराज…” म्हणत शिवेंद्रराजेंसोबत फोटो केला शेअर

Maha Guv in soup over Shivaji remark

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close