30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रखाण पट्टा मिळावा यासाठी वडार समाजाचा कराडात गाढव मोर्चा

खाण पट्टा मिळावा यासाठी वडार समाजाचा कराडात गाढव मोर्चा

टीम लय भारी

कराड : खाणपट्टा मिळावा यासाठी वडार समाजाच्या वतीने शुक्रवारी कराड तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. खाणपट्टा देण्यास प्रशासन विलंब करत असल्याने हा मोर्चा काढण्यात आल्याचे संजय चव्हाण यांनी सांगितले (Vadar community staged a donkey march at Karad).

कोरोनामुळे वडार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला रोजगार नाही. त्यांनी जगायचे कसे हा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार नांदलापूर, केस पाडळी इथे खाण पट्टा देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. नायब तहसीलदार विजय माने यांनी निवेदन स्वीकारले. या मोर्चात मोठ्या संख्येने वडार समाज बांधव सहभागी झाले होते. गाढवांचा सहभाग घेतल्याने हा मोर्चा लक्षवेधी ठरला. दरम्यान या मोर्चास वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याचे सचिव शरद गाडे यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट, अन् पोलिसांची पळापळ

रोहित पवारांचा पुढाकार, गटसचिवांचे प्रश्न मांडले मंत्रालयात !

निवेदनात म्हटले आहे की, नांदलापूर व पाडळी तालुका कराड येथे दगड व माती उत्खननाचा परवाना वडार समाजास मिळणे बाबत. दि. 15 ऑगस्ट रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी पत्र देऊन त्यासंदर्भात तहसीलदार यांनी कार्यवाही करावी असा आदेश दिला होता. परंतु आदेश देऊनही तहसीलदार यांनी सदर खानपट्याची मोजणी झाले नसल्याबद्दल व मोजणी झाल्या शिवाय कारवाई करता येणार नाही असे कळविले आहे.

शरद पवारांच्या मित्रासाठी कायदा दुरुस्ती केली नव्हती, राज्य सरकारचा दावा

Maharashtra News LIVE Updates: CM Uddhav Thackeray meets injured civic official Kalpita Pimple

सदर खाणपट्याची कोल्हापूर येथील पथकाने मोजणी केल्याचे दिसून येत आहे. अशा परस्थितीमध्ये तहसीलदार हे आम्हास व जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा चुकीचा अहवाल देऊन आम्हा वडार समाजास खाणपट्टा देण्याचे टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे (Therefore, the time of famine has come upon us).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी