28 C
Mumbai
Sunday, September 10, 2023
घरव्हिडीओVIDEO : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरचा...

VIDEO : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरचा गणपती

ज्या सणाची सर्वजण उत्सुकतेने वाट बघत होते. तो दिवस आज उजाडला. आज राज्यात सगळीकडे गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. आज संपूर्ण देशातील वातावरण भावपूर्ण आणि भक्तीमय बनले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या परळी येथील निवासस्थानी आज वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमन झाले. धनंजय मुंडे यांनी सहपरिवार गणपतीची पूजा केली. त्यांच्या घरी गणपतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोविड नंतर प्रथमच मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, गणरायाच्या अगमनाने शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांना सुख, शांती लाभो सर्व प्रकारची नैसर्गिक संकटे दूर होवोत अशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी केली.

दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे उत्सवांवर बंदी होती. या वर्षी सरकारने बंदी उठवल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावण पसरलंय. लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सगळीकडे गणपती बाप्पांचे स्वागत एकदम धुमधडाक्यात सुरु आहे. लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नागरिकांनी बाप्पाच्या स्वागतासाठी आकर्षक देखावे तयार केले आहेत. लहान थोर सगळे जण सणाचा आनंद घेत आहेत. गणपतीसाठी धनंजय मुंडे यांच्या घरी पाहूणे देखील उपस्थित होते.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी