28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeव्हिडीओVIDEO : धनंजय मुंडेंनी वडिलधाऱ्यांना जेवू घातले, अन् ‘शिवभोजन’चा शुभारंभ केला

VIDEO : धनंजय मुंडेंनी वडिलधाऱ्यांना जेवू घातले, अन् ‘शिवभोजन’चा शुभारंभ केला

टीम लय भारी

बीड : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने राज्यभरात शिवभोजन योजना सुरू केली. बीडमध्येही या योजनेचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी शुभारंभ झाला. शिवभोजनाचा पहिला मान मुंडे यांनी वडिलधाऱ्या सामान्य लोकांना दिला. शेख मन्सूर शेखचाँद, महादेव भारती महाराज, दामू जोगदंड, आनंद पडुळे आणि नवनाथ भोंडगे या वडिलधाऱ्यांनी शिवभोजनवर ताव मारून मुंडे यांचे आभार मानले.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हॉटेल समाधान’मध्ये शिवभोजन योजनेचा शुभारंभ मुंडे यांनी फित कापून केला. फित कापल्यानंतर त्यांनी शिवभोजनची पहिली पंगत उठविली. पंगतीला बसण्याचा मान वडिलधाऱ्यांना दिला. भोजन करणाऱ्या या वडिलधाऱ्यांसोबत आणि अन्य सामान्य लोकांसोबत त्यांनी यावेळी गप्पा मारल्या. या योजनेअंतर्गत पुरविण्यात येणारे खाद्यपदार्थ, जेवणाच्या वेळा, लाभार्थ्यांसाठीची पंगत व्यवस्था अशी बारीक सारीक माहितीही मुंडे यांनी हॉटेल चालकाकडून घेतली. स्वादिष्ट व पौष्टीक जेवण सामान्य लोकांना देत जा, असे चालकाला सांगायलाही ते विसरले नाहीत.

VIDEO : धनंजय मुंडेंनी वडिलधाऱ्यांना जेवू घातले, अन् ‘शिवभोजन’चा शुभारंभ केला
जाहिरात

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील, तहसिलदार किरण अंबेकर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सचिन खाडे आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडेंनी पाच अंधांना दिले लाखाचे धनादेश

मिळालेल्या मंत्रीपदाचा सामान्य लोकांसाठी कसा वापर करायचा याचा आदर्श वस्तुपाठही धनंजय मुंडे यांनी घालून दिला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सामान्य पाच अंध व्यक्तींना त्यांनी ध्वजारोहन सोहळ्याप्रसंगी सुखद भेट दिली. या पाच जणांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे असे एकूण पाच धनादेश त्यांनी सरकारच्या वतीने दिले. बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांची ही पहिलीच स्वाक्षरी होती. प्रजासत्ताक दिन म्हणजेच प्रजेचा दिवस असलेल्या या शुभमुहूर्तावर त्यांनी मध्यरात्री १ वाजता या धनादेशांवर स्वाक्षरी केल्या. या पाच अंध व्यक्तींना मदत देण्याची घोषणा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्याची त्यांनी तत्परतेने अंमलबजावणी सुद्धा केली.

VIDEO : धनंजय मुंडेंनी वडिलधाऱ्यांना जेवू घातले, अन् ‘शिवभोजन’चा शुभारंभ केला

दृष्टीहिन व निराधार असलेले यादव क्षीरसागर, विठ्ठलबाई क्षीरसागर, सम्राट क्षीरसागर, राजाबाई साठे, मुरलीधर साठे व सम्राट अशा सहाजणांनी दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुंडे यांनी या दृष्टीहिनांना मदत केलीच पाहिजे अशी सुचना अधिकाऱ्यांना केली होती. एवढेच नव्हे तर दिव्यांग बीज भांडवल योजना व विभागाच्या शेष निधीतून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार या पाच जणांना धनादेश जारी करण्यात आले. सम्राट या तरूणाचे १८ वर्षे वय पूर्ण नसल्याने तो या लाभाचे निकष पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे सम्राटचे शिक्षण व पूरक खर्चासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

VIDEO : धनंजय मुंडेंनी वडिलधाऱ्यांना जेवू घातले, अन् ‘शिवभोजन’चा शुभारंभ केला

मुंडे यांच्याकडून इतक्या तत्परतेने मिळालेल्या मदतीबद्दल या सगळ्या लाभार्थींनी आभार व्यक्त केले. ‘मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला नगद नारायण पावले!” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

धनंजय मुंडेंचा वंचितांसाठी मोठा निर्णय, मुंबईत १६ हजार घरे देणार

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना बजावले, योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी धनंजय मुंडेच्या निगराणीखाली होणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी