29 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeव्हिडीओShahajibapu Patil यांनी काहीही विकास केलेला नाही

Shahajibapu Patil यांनी काहीही विकास केलेला नाही

लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी नुकताच सांगोला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला(Shahajibapu Patil has not developed anything). आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चीकमहूद या गावी तुषार खरात यांनी भेट दिली. गावातील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेत असताना यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले.

लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी नुकताच सांगोला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला(Shahajibapu Patil has not developed anything). आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चीकमहूद या गावी तुषार खरात यांनी भेट दिली. गावातील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेत असताना यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले. आमच्याही प्रतिक्रिया घ्या, मुलाखती घ्या, असा आग्रह शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. यावेळी दिवंगत गणपतराव देशमुख व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले.

शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

दोन्हीही कार्यकर्ते आपापली बाजू नेटाने लावून धरत होते. शहाजीबापू पाटील यांची राज्यभरात गद्दार, खोकेबहाद्दर अशी प्रतिमा तयार झाली असल्याचे संपादक तुषार खरात यांनी विचारले असता, शहाजीबापू पाटील यांनी भरपूर कामे केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. भाजपने शरद पवार व बाळासाहेब ठाकरे या दोन मराठी माणसांचे पक्ष फोडल्याकडे तुषार खरात यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे हे अडिच वर्षे घरातच बसून होते. शरद पवार राजकारण करतात, असे शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते म्हणाले. यावेळी माण – खटावमधील आमदार जयकुमार गोरे यांच्या गुंडगिरीचा उल्लेख संपादक तुषार खरात यांनी केला.

आमदार कामाचे; बलात्कारी, खूनी यांना जेलमधून सोडवले, तळीरामाने खरे सांगितले

शहाजीबापू पाटील यांच्या गावात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते लोकशाही पद्धतीने विचार मांडत आहेत. पण माण – खटाव मतदारसंघात अशा पद्धतीने विचार मांडण्याची सोय नाही, असा उल्लेख तुषार खरात यांनी केला. यावर शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते खवळले. माण – खटावच्या आमदारांविषयीचे प्रश्न त्यांच्या मतदारसंघात विचारा. आमच्या मतदारसंघात कशाला विचारता असा सवाल शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तर कै. गणपतराव देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार देशात कुठेही फिरू शकतात. कोणाही बद्दल प्रश्न विचारू शकतात. माण – खटाव मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातच येतो. त्यामुळे माणविषयी या ठिकाणी प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही, अशी भावना देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. लय भारी फेसबूक

Shetkari Samvad Yatra : शहाजी बापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंना तुफान प्रतिसाद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी