टीम लय भारी
मुंबईः एकनाथ शिंदे यांना आम्ही अमृत पाजलयं. त्यामुळे त्यांची गाडी बुलेटनपेक्षा वेगाने धावेल. स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्त ‘संकल्प से सिध्दी‘ या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी पुढचे 25 वर्ष आपल्याला काय करायचे, त्याचा एक प्रकारे आढावा घेतला. शपथविधी नंतर आम्ही लगेच काम सुरु केले. केंद्र सरकार आमच्या सरकारला मदत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशिर्वाद आहे. अमित शाहांची साथ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आता नितीन गडकरी आपल्याला जास्त मदत करणार आहेत. यापूर्वी नितीन गडकरींनी केलेल्या महामार्गांचा आणि उड्डाण पूलांच्या कामांचा उल्लेख केला.
हे सुध्दा वाचा:
Breaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिर