28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटेक्नॉलॉजीतुमची गुपीतं उघड करणाऱ्यांचा होणार भांडाफोड; चॅटिंगचे स्क्रीनशॉट घेतल्यास व्हॉट्सअ‌ॅपवर नोटिफिकेशनचा अलर्ट

तुमची गुपीतं उघड करणाऱ्यांचा होणार भांडाफोड; चॅटिंगचे स्क्रीनशॉट घेतल्यास व्हॉट्सअ‌ॅपवर नोटिफिकेशनचा अलर्ट

टीम लय भारी

नवी दिल्ली:  मोबाईलच्या युगात प्रायव्हसी हाय पृथ्वी मोलाची, तू कर बिनधास्त चॅटिंग गड्या तुले भीती कशाची नी परवा भी कुणाची? आता तुम्ही म्हणाल भावड्या असा झोकात  कायले अशी गाणी बडबडून -हायला. तर मित्रांनो सांगतो, व्हाट्सअपने एक झकास फिचर्सची तयारी केली आहे(WhatsApp: Notification alert if you take a screenshot of chatting)

म्हणजे येत्या काही दिवसांत ते फिचर्स तुमच्या मोबाईलवर येऊन धडकेलच. तर हे नवं आयुध आहे तुमचा खासगीपणा जपण्यासाठी. डिजिटल युगात तुमचा खासगीपणा  अरे हो बाबा, तुमची  ‘Privacy’ जपणं अधिक गरजेचे झाले आहे.

Nagpur MLC Election Result 2021: भाजपचं प्लॅनिंग यशस्वी, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

नागपूरमध्ये कोण बाजी मारणार???

गेल्या काही दिवसांपासून युझर्सचा डाटा चोरून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे  अनेक प्रकार उघड झाले आहेत. या तक्रारींचा सूर ओळखून व्हाट्सअप नवनवीन फिचर्सच्या माध्यमातून युजर्सची प्रायव्हसी जपते. आता युजर्सच्या सुरक्षेसाठी पुन्हा नवीन फिचर्स येऊ घातलं आहे.

दोन व्यक्ती लिखीत स्वरुपात  संवाद साधत असताना समोरील व्यक्तीने स्क्रीन शॉट काढला तर व्हाट्सअप तुम्हाला त्याची त्वरीत माहिती देईल. त्यासंबंधीचे नोटीफिकेशन त्वरीत तुम्हाला मिळेल. हे फिचर्स उपलब्ध झाल्यास जगातील कोट्यवधी युजर्सला त्याचा फायदा होणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा दमदार एंट्री

WhatsApp’s new privacy update will restrict

मीडिया रिपोर्टसनुसार, व्हाट्सअपने या फिचर्सवर अनेक दिवसांपूर्वीच काम सुरु केले आहे. या फिचर्सचा उद्देश युजर्सची प्राईव्हसी जपणे हा आहे. जेव्हा एखादा व्यक्ती स्क्रीनशॉट काढतो. त्याचवेळी व्हाट्सअप त्याला नोटिफिकेशनद्वारे याची माहिती देईल.

तीन ब्लू टीक

व्हाट्सअपवर जेव्हा दुसरा व्यक्ती मॅसेज वाचतो. त्यावेळी व्हाट्सअपवर मॅसेज रीड झाल्याच्या दोन ब्लू खूण निर्देशीत करते की, त्याने मॅसेज वाचला आहे. तसेच ज्यावेळी या मॅसेजचा तो स्क्रीन शॉट घेईल त्याचवेळी या नवीन फिचर्समुळे तीन ब्लू टीक होतील.

अधिकृत घोषणा नाही

अजून हे फिचर्स बाल्यावस्थेत आहे.ते अजुनही रिलीज करण्यात आलेले नाही. यावर काम सुरु आहे. रिपोर्टसनुसार, लवकरच नव्या फिचर्सवर चाचणी सुरु होणार आहे. चाचणी यशस्वी होताच हे फिचर रिलीज करण्यात येईल. अद्यापही कंपनीने अधिकृतरित्या या फिचर्सची पुष्टी केलेली नाही. पण रिपोर्ट आधारे, लवकरच हे फिचर्स युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता दाट आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी