30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील लॉकडाऊन शिथील होणार?; हा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन!

राज्यातील लॉकडाऊन शिथील होणार?; हा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन!

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत आहे त्यामुळे राज्यसरकार लॉकडाऊन (Lockdown) शिथील करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. आता सर्वांच्या नजरा सरकार लॉकडाऊन (Lockdown) कधी उठवणार याकडे लागले आहे. परंतु या अनुषंगाने चार टप्प्यात राज्य अनलॉक करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे, असा ठाकरे सरकारचा प्लॅन (Thackeray government plan) आहे.

पण, यापूर्वीचा अनुभव पाहता ठाकरे सरकार (Thackeray government) लॉकडाऊन (Lockdown) उठवताना कोणतीही घाई होणार नाही, याची विशेष काळजी घेणार आहे. त्यासाठी राज्यातील लॉकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजांचे दोन्ही सरकारला आवाहन…

फडणवीसांनी राज्याला मदत मिळावी म्हणून केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार

Former Mumbai police chief gets protection from arrest in FIR filed on corruption allegations

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकार (Thackeray government) 1 जूनपासून लॉकडाऊन (Lockdown) उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात ठाकरे सरकारकडून (Thackeray government) लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी