32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकोरोना मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा ; माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी

कोरोना मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा ; माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी

टीम लय भारी

मुंबई :- कोरोना लसच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे. या फोटोवरून विरोधकांसोबत भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना मृतांच्या मृत्यू प्रमाणापत्रावर ही मोदींचा फोटो छापा अशी मागणी माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केली आहे (Former Chief Minister Jeetanram Manjhi has demanded that Modi photo be printed on the death certificate of Corona).

झारखंड आणि छत्तीसगडने तर प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी जीतनरा मांझी यांनी केली आहे (Jeetnara Manjhi has demanded that Modi’s photo should also be printed on the death certificates of those who died due to corona).

राज्यातील लॉकडाऊन शिथील होणार?; हा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन!

मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजांचे दोन्ही सरकारला आवाहन…

बिहारमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता आहे. जीतनराम मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा या आघाडीतील घटकपक्ष आहे. त्यामुळेच मांझी यांनी केलेल्या मागणीने सगळ्यांनाच धक्का बसला. ‘कोरोनाची लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र छापण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील मोदींचा फोटो असायला हवा,’ असे ट्विट मांझी यांनी केले आहे (Jeetnara Manjhi has demanded that Modi’s photo should also be printed on the death certificates of those who died due to corona).

कोरोना मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा ; माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी

कोरोना लसीकरण झालेल्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधानांचा फोटो छापण्याची गरज काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. यानंतर आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चाने त्यापुढे जात मोदींना खोचक टोला लगावला आहे. ‘लसीच्या प्रमाणपत्रांवर फोटो छापण्याचा इतकी हौस असेल तर कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील फोटो छापला जावा. तेच न्यायाला धरून असेल,’ असे जीतनराम मांझी (Jeetnara Manjhi) यांनी ट्विटमध्ये म्हटले. मात्र थोड्याच वेळात त्यांनी ट्विट डिलीट केले.

पंतप्रधानांना लक्ष्य करणारं ट्विट डिलीट करण्याच्या आधी त्यांनी रविवारी रात्री एक ट्विट केले होते. ‘कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मला एक प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावर पंतप्रधानांचा फोटो आहे. देशातील घटनात्मक संस्थेचे प्रमुख राष्ट्रपती असतात. त्या नात्याने प्रमाणपत्रावर राष्ट्रपतींचा फोटो असायला हवा. फोटो छापायचाच असेल तर राष्ट्रपतींच्या जागी पंतप्रधानांचा आणि स्थानिक मुख्यमंत्र्यांचा फोटो छापता येईल,’ असे जीतनराम मांझी (Jeetnara Manjhi) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी