32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजांचे दोन्ही सरकारला आवाहन...

मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजांचे दोन्ही सरकारला आवाहन…

टीम लय भारी

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मान्य नाही. मराठा समाजाच्या (Maratha Samaj) अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. त्याचबरोबर मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजांचे दोन्ही सरकारला आवाहन केले आहे (Don’t make the Maratha community take to the streets again, Sambhaji Raj has appealed to both the governments).

खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) हे येत्या २७ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

फडणवीसांनी राज्याला मदत मिळावी म्हणून केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार

नामनियुक्त फाईल गायब झाल्याने शिवसेनेचा राज्यपालांना खोचक टोला

मराठा समाजाची (Maratha Samaj) भूमिका समजून घेण्यासाठी आपण मराठवाडा खानदेश असा महाराष्ट्र दौरा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढणार असल्याचे संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी सांगितले. आंदोलन हा एक भाग आहे. पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता जीव वाचणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे अशा वेळी आंदोलन हा विषयच चुकीचा आहे, त्यामुळे या प्रश्नावर अन्य मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना भेटणार आहे, असे ही संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले.

Coronavirus: Three-tier lockdown imposed in Rajasthan from today till June 8

येत्या २७ तारखेला या सगळ्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाची (Maratha Samaj) भूमिका समजावून देणार असल्याची माहिती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी दिली. आपल्याला उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी भेटायला बोलावले असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

संभाजीराजे (Sambhaji Raje) पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारांनी अशी भूमिका घ्यावी की मराठा समाजाला (Maratha Samaj) पुन्हा रस्त्यावर उतरायला लागू नये. आधीच ५८ मोर्चे काढले आहेत. अजून किती वेळा लोकांना रस्त्यावर आणायचे?  सध्या मराठा समाज (Maratha Samaj) अस्वस्थ असला तरी ही कोरोना काळात जीव महत्त्वाचा त्यामुळे अशा वेळी आंदोलन हा पर्याय नाही.

सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल धुडकावून लागला. त्यामुळे मराठा समाजावर (Maratha Samaj) अन्याय झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी शाहू महाराजांनी चळवळ सुरु केली. त्यांनी राज्याला देशाला पुरोगामी चळवळीची दिशा दिली, असे ही संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी