32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeजागतिकसौदीमध्ये 10 दिवसांमध्ये 12 जणांना मृत्यूदंड; वाचा काय आहे कारण...

सौदीमध्ये 10 दिवसांमध्ये 12 जणांना मृत्यूदंड; वाचा काय आहे कारण…

अंमली पदार्थांच्या आरोपाखाली तुरुंगात टाकल्यानंतर तब्बल 12 जणांना फाशीची शिक्षा.

सौदी अरेबियामध्ये गेल्या 10 दिवसांत अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्याखाली 12 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. यापैकी काहींचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आल्याची माहिती आहे. ‘टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, अंमली पदार्थांच्या आरोपाखाली तुरुंगात टाकल्यानंतर तब्बल 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यांमध्ये तीन पाकिस्तानी, चार सीरियन, दोन जॉर्डन आणि तीन सौदी यांचा समावेश आहे.

सौदीच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
याच वर्षी शनिवारी (12 मार्च) रोजी सौदी अरेबियाने तब्बल 81 लोकांना फाशी दिली होती. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना हत्या आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या विविध कारवायांसाठी
फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, (या संघटनांमध्ये इस्लामिक स्टेट, अल-कायदा आणि येमेनच्या हूती अशा बंडखोर गटांचा उल्लेख करण्यात आला होता.) तापर्यंतच्या सौदी अरेबियाच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई होती.
अशा प्रकारच्या शिक्षा कमी करण्याचं दिलं होतं आश्वासन
क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी दिलेल्या आदेशानुसार 2018 मध्ये मारेकऱ्यांनी तुर्कीमधील अमेरिकन पत्रकार जमाल खशोग्गी यांची हत्या केली. अमेरिकन पत्रकाराच्या या हतेच्या पार्श्वभूमीवरच फाशी व अशा प्रकारच्या इतर शिक्षा कमी करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिलं होते. केवळ खून किंवा हत्याकांडात दोषी आढळलेल्यांनाच फाशीची दिली जाईल,अस सांगत शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोन वर्षांतचं पुन्हा एकदा सौदी अरेबियाने टोकाची शिक्षा दिली आहे.
मानवाधिकार संघटनांच्या आरोपांना सौदीने फेटाळले.
मानवाधिकार संघटनांनी सौदी अरेबियाच्या न्याय व्यवस्थेवर प्रश्न करत, “12 मार्च 2022 रोजी फाशी देण्यात आलेल्या बहुतेकांना आपली कायदेशीर बाजू मांडण्याची संधी न देताच शिक्षा देण्यात आली” असे आरोप सौदी अरेबियन प्रशासनावर लावले. परंतु मानवाधिकार संघटनेने लावलेल्या प्रतेक आरोपाला सौदी अरेबियाने फेटाळुन लावले.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंचे आणखी तीन खासदार, आठ आमदार शिंदे गटात येणार!; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा दावा

Shraddha Murder Case : ‘जे झालं ते चुकून झालं!’ श्रद्धा हत्याकाडांचा आरोपी आफताबची न्यायालयासमोर कबूली

इंडोनेशिया भुकंपाने हादरले; 46 जणांचा मृत्यू

फाशीची शिक्षा देणाऱ्या देशांमध्ये सौदी पाचव्या क्रमांकावर
मृत्युदंडाची शिक्षा देणाऱ्या देशांमध्ये इराण अव्वल आहे. 2021 मध्ये 314 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली तर 2020 मध्ये 246 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती, तर सौदी अरेबियाचे स्थान पाचव्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये दिलेल्या एकूण फाशीपैकी 80% फाशी इराण, इजिप्त आणि सौदी अरेबियामध्ये देण्यात आली आहे. 2022 मध्येही फाशीच्या केसेसमध्ये कोणतीही घट झाली नाही, एमनेस्टीने केला निषेध इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये 2022 च्या सुरुवातीच्या महिन्यांतही फाशीच्या शिक्षेत कोणतीही घट झालेली नाही.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी