29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeशिक्षणपोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी डीबीटी वर अर्ज करण्याकरिता मुदतवाढ

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी डीबीटी वर अर्ज करण्याकरिता मुदतवाढ

टीम लय भारी

मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे(Post Matric Scholarship, Extension for application on DBT).

उच्च शिक्षणातील काही विषयायील प्रवेश प्रक्रिया व राउंड अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करता यावा, याचा विचार करून विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक साठी अर्ज करणे तसेच पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे.

हे सुद्धा वाचा

ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध , राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन

शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणू नका,वर्षा गायकवाड यांचं आवाहन

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ : धनंजय मुंडे

Maharashtra education board seeks vax data on Std 10 & 12 students

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी