26 C
Mumbai
Tuesday, September 24, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंचा 'या' नव्या योजनेला ग्रीन सिग्नल

आदित्य ठाकरेंचा ‘या’ नव्या योजनेला ग्रीन सिग्नल

टीम लय भारी

मुंबई :- कालच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत साहसी पर्यटन धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर स्कुबा डायविंग, पॅरा ग्लायडिंग सारख्या खेळांना नोंदणी झाल्यानंतर मान्यता देण्यात येईल असे स्पष्ट केले (Aditya Thackeray gives green signal to new scheme).

महाराष्ट्राच्या 2021 च्या पर्यटन धोरणासाठी साहसी पर्यटनाबाबत मान्यता मिळाली असल्याने आदित्य ठाकरे साहसी खेळांच्या महत्वाबद्दलही जागरूक असल्याचे दिसते. या खेळांत स्पर्धात्मक साहसी खेळ तसेच वन्यजीव अभयारण्यात ओपन जीप सफारी यासारख्या खेळांना समाविष्ट करून घेतलेले नाही.

‘2022 पासून सर्व सरकारी वाहने विजेवर चालणारी असतील’, आदित्य ठाकरे

प्रवीण दरेकरांची आघाडी सरकारवर घणाघात टीका; सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी

राज्यात साहसी पर्यटन आयोजित करण्यासाठी प्रथम पर्यटन संचालनाकडून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र व आवश्यक सर्व आर्हता प्रदान केली जवळ, तदनंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल.

साहसी पर्यटन धोरणाच्या अंमलबजावणी करता राज्यस्तरीय व विभागीय स्तरावर समित्या स्थापन केल्या जातील. या समितीच्या सदस्यांमध्ये जमिनीवरचे, आकाशातले तसेच जलसहसी खेळातले तज्ञ व्यक्तींचा समावेश असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षेचे भान ठेवून शिस्तबद्ध रित्या खेळ अमलात आणले जातील (Games will be conducted in a disciplined manner under the guidance and with a sense of safety).

दुसऱ्या राज्यातुन येणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्राची दारे उघडी; राजेश टोपे

Maharashtra: CM Uddhav Thackeray Announces Tourism Minister Aditya Thackeray’s Pet Project ‘Adventure Tourism Policy’ To Boost Tourism in State

Aditya Thackeray gives green signal to new scheme
आदित्य ठाकरे

साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्थांनी पर्यटकांच्या सुरक्षेबाबत धोरणात नमूद केलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. यासाठीच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in  या संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी