28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयदीपक केसरकरांना अरविंद सावंतांकडून प्रत्यूत्तर

दीपक केसरकरांना अरविंद सावंतांकडून प्रत्यूत्तर

लय भारी टीम

मुंबई :राज्यातील राजकीय बंडखोरीमुळे ‘बंडोबा गट’ आणि ‘शिवसेना’ यांच्यातील वाद आणखी चिघळत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवबंधन हे पक्षाचं बंधन आहे अशी आठवण करून देत तुम्ही पक्षद्रोह करत आहात असे केसरकरांना त्यांनी खडसावले आहे.

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि दीपक केसरकरांनी उपस्थित केलेला मुद्दा खोडून काढत शिवसेनेची भूमिका स्षष्ट केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्षातून हाकालपट्टी केली यावर आक्षेप घेत दीपक केसरकर यांनी ‘हे आक्षेपार्ह’ असल्याचे म्हटले होते त्याला प्रत्युत्तर देत सावंत म्हणाले, ” शिवबंधन हे पक्षाचं बंधन आहे… तुम्ही सातत्याने प्रतिसाद दिला नाही याचा अर्थ तुम्ही पक्षद्रोह करत आहात, असे सोशल मिडीयावर व्यक्त होत त्यांनी बंडखोरांना सुनावले आहे.

ट्विटरवर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादाची क्लिप सुद्धा जोडलेली आहे. त्यामध्ये शिवसेनेची भूमिका खमकेपणाने मांडली आहे. सावंत म्हणाले, ही जी राजकीय परिस्थिती आहे त्यावर पक्षाच्या बैठका होणं स्वाभाविक आहे, मात्र वंदनीय शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते, ते आजारी असताना ही जी कारस्थाने करून त्यांच्या पाठीत सूरा खूपसला गेला यासाठी दुःखी आहोत, असे सावंत म्हणाले.

सावंत पुढे म्हणाले, आमच्या हातात शिवबंधन आहे ज्यामध्ये एक बंधन असते, त्या शिवबंधनाबरोबर आमच्या संघटनेच्या घटनेचे सुद्धा बंधन आहे. त्या संघटनेच्या घटनेने उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत. पक्षात बेशिस्त वर्तन केल्यानंतर त्यावर कारवाई करण्याचा त्यांना पुर्ण अधिकार आहे, म्हणून त्यांनी ही कारवाई केली. बंडखोरांना सातत्याने बोलवून सुद्धा यावर प्रतिसाद दिला नाही याचा अर्थ पक्षद्रोह करताय असे म्हणून सावंत यांनी खरडपट्टी काढली.

हे सुद्धा वाचा :

उदय सामंत अजूनही उद्धव ठाकरेंबरोबरच!

‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘

VIDEO : नव्या मुख्यमंत्र्यांबद्दल सामान्य लोकांना काय वाटतं…. ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी