29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeएज्युकेशनराज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी ५ वी आणि ८ वी ची शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती परिपत्रक काढून देण्यात आली आहे. त्यामुळे दि. २० जुलै २०२२ ला होणारी ही शिष्यवृत्तीची परीक्षा आता दि. ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावयाची आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राज्य परीक्षा परिषदेकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश स्थिती आणि बहुतेक ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे या प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकात लिहिण्यात आले आहे.

त्यामुळे आता राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृततू परीक्षा (इ. ८ वी) यांच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. म्हणून शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आणखी थोडा वेळ मिळाला आहे.

राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

हे सुद्धा वाचा :

नेमका कधी जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल ?

भारतात ‘नैरोबी फ्लाय’ माशीची दहशत

नगर परिषद निवडणुकीबाबत ओबीसी उमेदवारांना मिळाला दिलासा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी