32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराष्ट्रीययशाचे श्रेय घेण्यात 'अमित शाह' हुशार

यशाचे श्रेय घेण्यात ‘अमित शाह’ हुशार

टीम लय भारी

नवी दिल्ली: कृषी निर्यातीने पहिल्यांदाच 50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय, हे मोदी सरकारची शेतकऱ्यांप्रती असणारी कटिबद्धता व्यक्त करणारे असल्याचेही शाह म्हणाले. जेव्हा उपलब्ध असलेल्या निधीतील पैसा न पैसा ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रातील वित्त आणि पुनर्वित्त यासाठीच खर्च होईल तेव्हाच नाबार्डची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. शेती नशिबाच्या हवाली न सोडता, श्रमाच्या बळावरील शेती म्हणून रुपांतरित करण्याचे काम कृषी आणि ग्रामीण बँकांनी केली असल्याचेही ते म्हणाले.नवी दिल्लीत झालेल्या कृषी आणि ग्रामीण विकास बँकांच्या राष्ट्रीय संमेलनात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.

काही दशकांपूर्वी देशात काॅंग्रेसची सत्ता होती. त्यावेळी राबवलेलया पंचवार्षीक योजनांमुळे देशात हरितक्रांती झाली. तसेच धवलक्रांती झाली. मात्र आता कृषी उदयोगांशी संबंधीत श्रेय भाजप सरकार आपल्याकडे घेत आहे. यावर्षी 50 टक्केंचा टप्पा गाठल्याने अमित शहांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र कोरोना महामारी येण्यापूर्वी बळीराजाचे आंदोलन चिरडण्यासाठी भाजपने कंबर कसली होती.अखेर कोरोनाच्या लाटेत अनेक महिने चालले हे आंदोलन शमले होते. काळाच्या ओघात या गोष्टींचा विसर अमित शहांना पडला असावा.तसेच राज्यातील सहकार मोडण्याचा वीडाच भाजपने घेतला आहे. तिकडे बसून ते सहकाराचे कौतुक करत आहेत. ही अमित शहांची दुटप्पी भूमीका महाराष्टातील जनतेला आवडणर नाही.

सहकार क्षेत्राचा आयाम कृषी विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. या क्षेत्रविना आपण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करु शकणार नाही असेही शाह म्हणाले.भारतातील कृषी आणि ग्रामीण विकास बँकांचा इतिहास जवळपास 9 दशकांचा आहे. कृषी कर्जाचे दोन स्तंभ आहे. एक अल्पकालीन आणि दुसरा दीर्घकालीन 1920 च्या दशकात शेतकर्‍याला दीर्घकालीन कर्ज देण्यास सुरुवात झाली. ज्यामुळं शेतकऱ्यांचे त्यांच्या शेतात शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे स्वप्न साकार झाले. त्याआधी आपली कृषीव्यवस्था केवळ दैवावर आधारलेली असे, त्यावरून ती श्रमाच्या आधारावर नेण्याचे काम केवळ कृषी आणि ग्रामीण विकास बँकांनी केल्याचे अमित शाह म्हणाले.स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात देशात 64 लाख हेक्टर जमीन लागवडी योग्य झाली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत गेल्या 8 वर्षात 64 लाख हेक्टर शेतजमीन वाढली असल्याचे मत अमित शाह यांनी केलं.

सहकार क्षेत्रातील एखाद्या संस्थेचे पद भूषवणे पुरेसे नाही. तर 1924 पासून ज्या उद्देशाने या सेवा सुरु केल्या आहेत. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मी माझ्या कार्यकाळात काय करु शकतो. याचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे अमित शाह म्हणाले. या बँकांनी तीन लाखांहून अधिक ट्रॅक्टरसाठी वित्तपुरवठा केला आहे. परंतु आज देशात 8 कोटींहून अधिक ट्रॅक्टर आहेत. 13 कोटी शेतकऱ्यांपैकी साधारण 5 लाख 2 हजार शेतकऱ्यांना मध्यम आणि दीर्घकालीन वित्तपुरवठा केला असल्याचं शाह यांनी सांगितलं.

हे सुध्दा वाचा:

प्रा. हरि नरके यांची ‘ही‘ गोष्ट…. नक्कीच वाचा

दिपाली सय्यद यांनी ‘टोचले’ संजय राऊत यांचे कान

‘यांचा दाखवायचा आणि करायचा चेहरा वेगळा…’, पडळकरांचा नेमका रोख कोणाकडे?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी