33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रबॉम्बचा वापर करुन एटीएममध्ये चोरीचा डाव पोलिसांनी उधळला

बॉम्बचा वापर करुन एटीएममध्ये चोरीचा डाव पोलिसांनी उधळला

टीम लय भारी

कराड: जिलेटीन बॉम्बचा वापर करुन एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न कराडमध्ये चोरटयांनी केला. मात्र पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. सक्रिय करुन ठेवलेल्या जिलेटीन बॉम्ब शोधक पथकाने तेथेच स्फोट घडवून निकामी केले. कराडमध्ये बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ही घटना घडली. एटीएममध्ये 8 लाख 59 हजार रुपये रोकड होती. काही प्रमाणात नोटांचे नुकसान झाले आहे. मात्र उर्वरित रक्कम सुरक्षित आहे. जिलेटीन मोठ्या क्षमतेचे असल्याने मोठा स्फोट झाला, त्यामुळे परिसर दणणाला. चोरटे सराईत असून, त्यांच्याजवळ चार पेट्रोल बॉम्ब आढळून आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

गजानन हाउसिंग सोसायटी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये मध्यरात्री चार चोरटे चोरी करण्यासाठी आले होते. एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी जिलेटीन लावले होते. स्फोट घडवून एटीएम फोडायचे आणि रोकड चोरण्याची योजना चोरट्यांनी आखळी होती. मात्र कराड पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि चोरट्यांमध्ये झटापट झाली. डोळ्यात स्प्रे गेल्याने पोलीस जखमी झाले असून, त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघे जण फरार झाले. तर एकाला पकडण्यात यश आले. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

हे सुध्दा वाचा:

शिवसेनेचे 14 खासदार शिंदेगटाच्या वाटेवर

पावसाच्या पाण्याने घातला विदर्भाला वेढा

नक्की वाचा: ‘द्रौपदी टुडू मुर्मू’ यांची जिवन कहाणी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी