28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

अजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

टीम लय भारी

गडचिरोली : सत्तानाट्यानंतर आता राज्यातील अडचणी समजून घेण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांचे ठिकठिकाणी दौरे सुरू झाले असून त्यांच्याकडून त्या त्या ठिकाणच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षाचे नेते अजित पवार हे सुद्धा सध्या गडचिरोलीचा दौरा करीत असून तेथील पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत. वेळेच्या बाबतीत नेहमीच पक्के असणारे पवार यावेळी सुद्धा सकाळी 8 वाजताच शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहचत पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी यावेळी केली असून शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी सुद्धा समजून घेतल्या आहेत.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून याबाबत पंचनामे झालेत का असा प्रश्न विचारला, तेवढ्यात अद्याप पंचनामेच झाले नसल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटला. शेतकरी म्हणाले, गेल्या वर्षी पंचनामे झाले परंतु आता काहीच झालेलं नाही. कोणताच अधिकारी आमच्याकडे अद्याप आलेला नाही. आम्ही याबाबत भटवाड्याच्या कोतवालाकडे अर्ज दाखल केला आहे. पण आम्हाला तडीची मदत देखील अद्याप मिळालेली नाही. आमची केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा आहे बाकी आम्हाला काही नको असे म्हणत स्थानिक शेतकऱ्यांनी आपले दुःख व्यक्त केले.

अजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

दरम्यान शेतकरी पुढे म्हणाले, धानाच्या पिकावर आम्ही कर्ज घेतो, पण आता तेच राहिलेलं नाही. यासाठी आम्हाला एकरी साडेबारा हजार कर्ज मिळतं. जर प्रयत्न करुन रोपं दिली तर त्याचा उपयोग होईल का? अशी त्यावर अजित पवारांनी विचारणा केल्यानंतर त्याचा आता उपयोग होणार नाही असे उत्तर शेतकऱ्यांकडून मिळाले.

या दौऱ्याबाबत अजित पवार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत माहिती दिली आहे. पवार ट्विटमध्ये लिहितात, गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली; त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पोस्टद्वारे करीत दौऱ्याचे फोटो सुद्धा त्यांनी पोस्टसोबत जोडले आहेत.

हे सुद्धा वाचा…

प्रवाशांची पंचाईत! टॅक्सी, ऑटो चालकांचा 1 ऑगस्टपासून बेमुदत संप

पुढील दोन दिवसांत मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

बळीराजाला दिलासा! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ 13 महत्त्वपूर्ण निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी