29 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : अजित पवार म्हणाले, सत्ता नसली तरी कामे करणार

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, सत्ता नसली तरी कामे करणार

सत्ता नसेल तर विकास करता येत नाही, हा अनुभव बारामतीकरांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबोल उंचावण्यासाठी हे मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या नागरिकांना आश्वासन दिले की, जरी सध्या त्यांच्या पक्षाची सत्ता राज्यात नसली तरी ते आणि त्यांचा पक्ष अविरतपणे त्या भागाची विकासकामे करण्यात संपूर्ण प्रयास करत राहतील. अजित पवार सन १९९५ पासून बारामती विधानसभा क्षेत्रातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पवार यांची बहीण सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा क्षेत्रातून सन २००९ पासून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यामुळे पवार कुटंबियाना त्या भागाच्या समस्यांची चांगली जाण आहे.

बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीची  महाराष्ट्रातून सत्ता गेल्यानंतर बारामतीकरांच्या मनात विकास कामांविषयी धाकधूक निर्माण झाली होती. मात्र येथील विकासकामे सुरूच राहतील. मी आणि माझा पक्ष या क्षेत्राची आणि येथील लोकांची विकासाची कामे करण्यास बांधील आहे. आगामी काळात बारामती शहरात नऊ एकरांत उदयान उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय, येथे सध्या सुरू असलेली किंवा प्रलंबित असलेली विकासकामे देखील पूर्ण होतील.

हे सुद्धा वाचा

VIDEO : अंबादास दानवे म्हणाले, मी हल्ले केले, शस्त्रे वापरली

VIDEO : जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घाव !

Ajit Pawar :अजित पवारांनी सांगितल्या लहाणपणीच्या करामती, लोकांमध्ये पिकला हशा!

Ajit pawar : अजित पवारांची पुन्हा फटकेबाजी, सत्ताधारी बावचळले

सत्तेत असताना पवार यांनी केलेल्या कामांचे कौतुक कॅगच्या अहवालात करण्यात आले आहे. त्याचा देखील उल्लेख पवार यांनी यावेळी केला.

पवार पुढे म्हणाले की, सरकार हे येते, जाते. आम्ही सरकारमध्ये असताना राज्याच्या भल्याचा विचार करून कार्य केले. सत्तेत नसताना देखील विरोधी पक्षनेता म्हणून राज्यातील जनतेसाठी काम करीत आहोत  आणि त्यांच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी सध्याच्या सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा करत आहोत.

शरद पवार व अजित पवार हे वर्षानुवर्षे देशाच्या व राज्याच्या सत्तेत केंद्रस्थानी राहिलेले आहेत. सत्तेत असताना त्यांनी तसेच सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या विकासासाठी नेहमी प्राधान्य दिलेले आहे. कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, रोजगार, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात पवार यांनी बारामतीचा चौफेर विकास केलेला आहे. त्यामुळे बारामतीमधील जनता सुद्धा विकासाभिमुख झालेली आहे.

नवनवीन प्रयोग करायचे आणि व्यक्तिगत व सामाजिक विकास साधण्यासाठी झटायचे अशी संस्कृती बारामतीमध्ये विकसित झालेली आहे. परंतु विकास साधण्यासाठी किमान राज्यात तरी पवार यांची सत्ता असायला हवी अशी मानसिकता जनतेची झालेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात पवार हे सत्तेत नव्हते.

सत्ता नसेल तर विकास करता येत नाही, हा अनुभव बारामतीकरांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबोल उंचावण्यासाठी हे मार्गदर्शन केले.

आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी