33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रBaba Ramdev : 'महिलांनी काही घातले नाही तरी त्या चांगल्या दिसतात'

Baba Ramdev : ‘महिलांनी काही घातले नाही तरी त्या चांगल्या दिसतात’

ठाण्याच एका कार्यक्रमात योग गुरू रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ''साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिलं, तर काही घातले नाही तरी चांगल्या दिसतात'', असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. ठाण्यात योगाच्या कार्यक्रमासाठी योग गुरू रामदेव बाबा आले होते. यावेळी अमृता फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते.

ठाण्यात एका कार्यक्रमात योग गुरू रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ”साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिलं, तर काही घातले नाही तरी चांगल्या दिसतात”, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
ठाण्यात योगाच्या कार्यक्रमासाठी योग गुरू रामदेव बाबा आले होते. यावेळी अमृता फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते.

यावेळी रामदेव बाबा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील खुप स्तुती केली. तसेच अमृता फडणवीस यांची देखील त्यांनी यावेळी स्तुती केली. रामदेव बाबा म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील विराट व्यक्तीमत्व आहे, तर एकनाथ शिंदे हे उर्जावान व्यक्तीमत्त्व आहे. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे. मी जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही. एवढा पुरुषार्थ एकनाथ शिंदे यांच्यात आहे, असे रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांची देखील स्तुती केली. अमृता फडणवीसांबाबत बोलताना ते म्हणाले, अमृता फडणवीसांमध्ये तरुण राहण्याची इच्छाशक्ती मोठी आहे. त्या वयाची शंभर वर्षे होईपर्यंत वृद्ध होणार नाहीत. त्या नेहमीच तोलून मोपून आहार करतात, आनंदी राहतात, आणि लहान मुलांप्रमाणे त्या नेहमी हसतमुख असतात असे रामदेवबाबा यावेळी म्हणाले. रामदेवबाबा यांनी यापूर्वी देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत स्तुती केली आहे. एकनाथ शिंदे हे सनातन धर्मचाचे गौरव पुरूष आहेत, एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे आध्यात्मिक, राजकीय वारसदार आहेत असे देखील ते म्हणाले होते.
हे सुद्धा वाचा :

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितली ‘सिक्रेड गेम्स’च्या पडद्यामागची गोष्ट

शिखर धवनच्या नेतृत्त्वात होणार ‘वन-डे’चा महासंग्राम

या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी बोलताना राज्यपालांच्या छत्रपती शिवरायांच्या वक्तव्याबद्द्ल भाष्य केले. त्या म्हणाल्या कोश्यारी यांना मी जवळून ओळखते, त्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे. कोश्यारी हे एकमेव असे राज्यपाल आहेत जे मराठी भाषा शिकत आहेत. मराठी बोलण्याच्या ओघात ते काही तरी बोलून जातात मात्र त्यांच्या बोलण्याचा वेगळाच काही तरी अर्थ काढला जातो. मात्र कोश्यारी यांचे मराठीवर मनापासून प्रेम असल्याचे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी