29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमुंबईइंदू मिलवरील स्मारक लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापरिनिर्वाण दिनी ग्वाही

इंदू मिलवरील स्मारक लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापरिनिर्वाण दिनी ग्वाही

सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल स्मारकाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले की, इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2022 रोजी साजरा केला जात आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणावेळी म्हणाले की, ‘माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती आज मुख्यमंत्री झाला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडले आहे. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावना बाबासाहेबांननी काढून टाकली. दलित बांधवांमध्ये जो आत्मविशास निर्माण झाला, त्याचं श्रेय डॉ. आंबडेकरांना जाते.’ शिवाय यानंतर मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक लवकरच पूर्ण करणार असल्याची ग्वाही देखील दिली.

सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल स्मारकाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले की, इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे. बाबासाहेब यांचा आठवणी जपण्याचा काम केले जाईल. राजगृहवरील ऐतिहासिक ठेवा सुद्धा जपला जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

हे सुद्धा वाचा

बाबरी मशीद वादावरून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

कर्नाटक सीमा भागाचा दौरा करायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, फडणवीसांचे वक्तव्य

शिवसेना : संघर्षातून मजबुतीकडे! (आमदार प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांचा विशेष लेख)

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी रांग लागली आहे. त्यांना सर्व सुविधा देण्याचा काम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. अनुयायांनी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई महापालिकेकडे विशेष धन्यवाद व्यक्त करतो. शिवाय अनुयायांनीसुद्धा दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. यामुळे संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव अशी पदवी देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब एक लेखक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, आणि पत्रकारही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखले जातं. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते ज्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी चैत्यभूमीवर येतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी