29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना ठाकरेंची का शिंदेंची; सुनावणी आता पुढल्या वर्षीच !

शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची; सुनावणी आता पुढल्या वर्षीच !

सर्व दाखल याचिकांवर आता पुढील महिन्यात 13 जानेवारी 2023 रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचेही सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहेत.

3 महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेची साथ सोडत सरकार स्थापन केले. शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुक्यमंत्री एकनात शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर मंगळवारी (6 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणे सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व दाखल याचिकांवर आता पुढील महिन्यात 13 जानेवारी 2023 रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचेही सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहेत.

या याचिकांवरील सुनावणी करणाऱ्या खंडपीठात सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्याबरोबर न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा हे असणार आहेत. ही सुनावणी मागील महिन्यांत 29 नोव्हेंबरला होणार होती. मात्र, त्यावेळी ही सुनावणी न होता पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आजवर या प्रकरणातील सुनावणी प्रलंबित होती यावर आता सुप्रिम कोर्टाने स्पष्ट संकेत दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय पण फायदा मात्र टीम इंडियाला, वाचा संपूर्ण समीकरण

अशा वातावरणात त्यांनी येथे येऊ नये अन्यथा…, बोम्मईंचा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला इशारा

या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी पुढील सुनावणीसाठी 13 जानेवारी ही तारीख दिली. याला विरोध करताना उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सुनावणी आणखी लवकर घेण्यात यावी अशी विनंती केली. मात्र, या प्रकरणात त्याआधी सुनावणी घेता येणार नाही असे सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी स्पष्ट केले. आणि या प्रकणातील पुढील सुनावणीसाठी 13 जानेवारी ही तारीख नक्की करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड म्हणाले, “पुढील आठवड्यात सुनावणी घेणे शक्य होणार नाही, कारण पुढील आठवड्यात विविध प्रकरणांच्या सुनावणी आहेत. त्यामुळे पाच न्यायमूर्तींना घटनापीठात बसणं शक्य होणार नाही. म्हणून या प्रकरणांवरील सुनावणी 13 जानेवारी 2023 रोजी ठेवुयात.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी