28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईपंतप्रधान येत आहेत... दुपारी १२ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना घरी पाठवा !

पंतप्रधान येत आहेत… दुपारी १२ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना घरी पाठवा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे गुरुवारी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. मुंबई ‘मेट्रो’ ७ आणि मुंबई ‘मेट्रो २ अ’ चे लोकार्पण यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. वांद्रे-कुर्ला परिसरातील (Bandra-Kurla Complex) सर्व आस्थापनांना खबरदारीच्या उपाययोजना करण्यास पोलिसांनी सांगितले आहे. त्यासंदर्भात पोलिसांनी पत्रक जरी केले असून सर्व आस्थापनांना सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी या ठिकाणी येत असल्यामुळे हा सर्व परिसर सुरक्षेच्या कारणास्तव रहदारीस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दुपारी १२ वाजेपर्यंत घरी सोडण्यात यावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. त्यामुळे या परिसरातील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकर घरी जायला मिळणार आहे. (PM is coming… Send employees home by 12 noon!)

हे सुद्धा वाचा

पंतप्रधानांची सभा झाली की पुन्हा भिंत बांधू, एवढा गदारोळ कशासाठी?

पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबई दौरा; वाहतुक व्यवस्थेत असतील ‘हे’ बदल

महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडचा घास पळवला हाच मुंबईचा भाग्योदय का ?

 

पंतप्रधानाच्या स्वागतासाठी भाजपने संपूर्ण मुंबई बॅनर, मोदींचे मोठमोठे कटआऊटआणि झेंड्यांनी सजवली आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला ६० ते ७५ हजार लोक हजार राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संध्याकाळपर्यंत या परिसरातील सर्व मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. पंतप्रधानाच्या स्वागतासाठी मुबई पोलिसही डोळ्यात तेल टाकून पहारा देत आहेत.

पोलिसांनी केवळ कर्मचाऱ्यांबाबतच नव्हे, तर इतरही बारीकसारीक गोष्टींची खबरदारी घेतली आहे. याच परिसरातील कॉर्पोरेट बँकेच्या इमारतीवरून पडून नुकत्याच एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याबाबतही पोलिसांनी संबंधितांना काही सूचना दिला आहेत. इमारतीचे छप्पर सुरक्षित आहे का याबाबत खात्री करून घ्या. छतावर कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, असे पत्रकात म्हंटले आहे.

काय आहेत पोलिसांच्या सूचना :

  • कार्यरत सुरक्षा कर्मचाऱ्यांची पडताळणी करावी तसेच आस्थापनेत काम करत असलेल्या कंत्राटदारांची, मजुरांची यादी पोलीस ठाण्यात सादर करावी.
  • ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा व्यवस्थित कार्यरत आहे का हे तपासावे, एखादी संशयास्पद वस्तू सापडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
  • सायबर सुरक्षेविषयी कोणताही अनुचित प्रकार जसे की हॅकिंग संशयास्पद ई-मेल आल्यास पोलिसांना माहिती द्यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी