33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeराष्ट्रीयभारत मॅट्रिमोनिअलविरोधात सोशल मीडियावर बॉयक़ॉटचा ट्रेंड; वाचा काय आहे कारण

भारत मॅट्रिमोनिअलविरोधात सोशल मीडियावर बॉयक़ॉटचा ट्रेंड; वाचा काय आहे कारण

मॅट्रिमोनिअल वेबसाइट भारत मॅट्रिमोनिअलने होळीचा सण आणि अंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ आता वादात सापडला असून, नेटीझन्सनी भारत मॅट्रिमोनिअलवर बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. #BoycottBharatMatrimony हा ट्रेंड सध्या ट्विटरवर राबविला जात आहे. भारत मॅट्रिमोनिअलने होळीच्या सनानिमित्त एक व्हिडीओ सोशलमीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ हिंदूधर्मियांच्या भावनांना धक्का पोहचविणारा असल्याचा आरोप केला जात आहे. (Bharat Matrimonial against  Boycott trend on social media)

भारत मॅट्रिमोनिअलने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या चेहऱ्यावरील होळीचे रंग दिसत आहेत. त्यानंतर ती महिला वॉशरुममध्ये जावून चेहऱ्यावरील होळीचे रंग धूवून काढते. त्यानंतर तिला आपल्या नाकावर जखम असल्याचे दिसते. तसेच डोक्यावर देखील जखम असल्याचे दिसते. त्या व्हिडीओमध्ये एक संदेश देण्यात आलेला आहे. त्यात म्हटले आहे की, काही डाग असे असतात की सहजासहजी हटविले जावू शकत नाहीत. होळीच्या उत्सवामध्ये महिलांवर जी परिस्थिती ओढवते ती एखाद्या आघातापेक्षा कमी नसते. हा आघात अनुभवणाऱ्या जवळपास एकतृतियांश महिलांनी होळी खेळणे बंद केले आहे. त्यामुळे ही होळी तुम्ही महिला दिवस साजरा करा, महिला दिवस साजरा करुन तुम्ही महिलांसाठी आणखी सुरक्षित करु शकता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारत मॅट्रिमोनिअलविरोधात ट्विटरवर #BoycottBharatMatrimony हा ट्रेड सुरु झाला आहे. भारत मॅट्रिमोनिअलने हिंदूंच्या सणांचा अपमान केल्याची अनेकांची भावना झाली आहे. एका ट्विटर अकाऊंटवरुन भारत मॅट्रिमोनिअलचा निषेध करताना म्हटले आहे की, महिला दिनाचा संदेश होळीच्या सणासोबत न देता सहज दिला जावू शकला असता. मात्र त्यांचा तसा उद्देश नव्हता. होळीच्या सणाची विटंबना करण्याचे उद्दिष्ट होते. हिंदुविरोधी प्रचारासाठी वापर करणे बंद करा.

एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विट करत म्हटले आहे की, ईद साजरी केली जाते मात्र होळीचा सण साजरा करताना ज्ञान पाजळविले जाते .

हे सुद्धा वाचा
Photo : सनी लिओनीने लुटला होळीचा आनंद; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा

सावधान, देशात पुन्हा एक नवीन व्हायरस; काळजी न घेतल्यास होऊ शकतो मृत्यू!

हा महिला दिन ‘त्या’ महिलांना समर्पित…; महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी