29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeऑटोमोबाईलइन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशींनी दिला राजीनामा; आता 'या' कंपनीची धुरा सांभाळणार

इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशींनी दिला राजीनामा; आता ‘या’ कंपनीची धुरा सांभाळणार

इन्फोसिस ही एक लोकप्रिय टेक कंपनी आहे. या कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस आणि हेल्थकेअर/ लाइफ सायन्सेस बिझनेसचे हेड असलेले इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी (Mohit Joshi) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोहित जोशी गेल्या 22 वर्षांपासून इन्फोसिसमध्ये काम करत होते. मोहित जोशी यांनी राजीनामा दिला असून ते 9 जून 2023 रोजी कंपनीतून सेवामुक्त होतील, असे इन्फोसिसने जारी निवेदनात म्हटले आहे. मोहित जोशी आता टेक महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. (Infosys chairman Mohit Joshi resigns)

अलिकडच्या दिवसात इन्फोसिसच्या उच्च पदावरून पायउतार होणारे हे दुसरे व्यक्ती आहेत. इन्फोसिसच्या वरिष्ठ पदावरील रवी कुमार एस यांनी नुकताच राजीनामा दिला होता. ते आयटी कंपनी कॉग्निजेंटचे सीईओ बनले आहेत. मोहित जोशी आता टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

टेक महिंद्रा कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, मोहित जोशी यांना 20 डिसेंबर 2023 पासून कंपनीच्या संचालक मंडळावर घेतले जाईल. मोहित जोशी 19 डिसेंबर 2023 पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारतील. व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित जोशी यांनी इन्फोसिसच्या आधी ABN Ambro, ANZ Grindlays या कंपनीमध्ये काम केले आहे.

जोशी 2000 सालामध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झाले होते आणि त्यांनी कंपनीतील विविध स्तरांवर काम केले. 2007 मध्ये जोशी यांची इन्फोसिस मेक्सिकोचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इन्फोसिसच्या संचालक मंडळाने मोहित जोशी यांनी दिलेल्या सेवांबद्दल आणि कंपनीसाठी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. जोशी यांना अमेरिका, भारत, मेक्सिको आणि युरोपमध्ये काम करण्याचा व्यावसायिक अनुभव आहे. जोशी यांची जानेवारीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोसने यंग ग्लोबल लीडर (YGL) म्हणून निवड केली होती.

हे सुद्धा वाचा : 

वर्क फ्रॉम होम नकोच : ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती

महिंद्रा रॅली शानदार जानदार दमदार ऑफ रोड 4 बाय 4 ई-एसयूव्ही; हा कॉन्सेप्ट डिझाईन व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Infosys Shares : इन्फोसिस करतेय शेअर्स बायबॅकचा विचार! कंपनीच्या शेअर्समधील घसरण सुरूच

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी