27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeएज्युकेशनसंत झेवियर्स महाविद्यालयात मराठी संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या मराठी वाड:मय मंडळाची शंभरी पार

संत झेवियर्स महाविद्यालयात मराठी संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या मराठी वाड:मय मंडळाची शंभरी पार

(मंगेश फदाले)

संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाड:मय मंडळ ह्या वर्षी १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळ गेल्या शंभर वर्षांपासून मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या हेतूने अनेक उपक्रम आणि कार्यक्रम राबवत आले आहे. मराठी वाड:मय मंडळ मुंबई विद्यापीठाच्या सर्वात प्राचीन सांस्कृतिक समितींपैकी एक आहे.

“आमोद २०२४ – उलगडूया नावीन्य संस्कृतीचे ” संस्कृतीच्या या
नावीन्यतेचा यंदा अकरावा उत्सव साजरा करेल. ‘ आमोद : २०२४ ‘ दिनांक २० आणि २१ जानेवारी रोजी संत झेवियर्स महाविद्यालयात पार पडेल.

हे ही वाचा

मुंबई फेस्टिवल २०२४ ला सुरूवात

‘छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही’

‘२४ ऐवजी २२ तारखेला तपासणीसाठी बोलवा’

२१ जानेवारी रोजी मंडळाच्या वार्षिक मासिकाचे म्हणजेच “ पखरण ” चे उदघाट्न करण्यात येईल व याच दिवशी पॅनल डिस्कशन साठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी , सई गोडबोले , दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन आणि सतीश राजवाडे हे उपस्थित असणार आहेत. मंडळामध्ये ह्या अनोख्या सोहळ्याची खूप उत्सुकता आहे.

संत झेवियर्स महाविद्यालय मराठी वाड:मय मंडळाच्या कार्यकारी समितेने महाविद्यालयीन तरुणाई आणि मराठी संस्कृती प्रेमीन्ना ‘ आमोद २०२४ ‘ साठी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी