35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनकलाश्रमच्या 'अभियान सन्मान' उपक्रमात अभिनेते अशोक समेळ उपस्थित राहणार

कलाश्रमच्या ‘अभियान सन्मान’ उपक्रमात अभिनेते अशोक समेळ उपस्थित राहणार

रवींद्र भोजने : टीम लय भारी

अभियान सन्मान हा कलाश्रमचा मासिक उपक्रम आहे. जो स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत राबवला जातो.आज २८ फेब्रुवारीला प्रभादेवीच्या पु्. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होणारं उपक्रम हे त्र्येचाळीसवे पुष्प असणार आहे.(Actor Ashok Samel will be present in Kalashram’s ‘Abhiyan Sanman’ program)

कुठल्याही साली पण फेब्रुवारी महिन्यातच दिवंगत झालेल्या समाजात भरीव कार्य केलेल्या चार दिवंगताच्या नावाने कर्तृत्व सिद्ध करणा-या चार व्यक्तींना दखलपत्र देवून गौरवा़ंकीत केले जाते. यावेळी दिवंगताच्या यादीत अभिनेते महेश चौधरी, चित्रपट निर्मिते, पर्यावरण तज्ञ डॉ. किशोर भोईर, आदर्श गृहिणी व गाण्याची आवड जपणि-या माणिक शेंडगे, प्रभात फिल्म कंपनीचे सर्वेसर्वा पंडित दामले यांचा समावेश आहे. यांच्या नावाचे पुरस्कार अभिनेते सुनिल जाधव, वृत्त निवेदक व पर्यावरण प्रचारक विजय कदम, गायिका रुपाली आंगणे, दिग्दर्शक व बालरंगभूमीची धुरा समर्थपणे पेलणारे प्रशांत गिरकर यांना देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती बने करणार असून दखलपत्राच्या वाचनात प्रदीप कदम, रिद्धी बांदिवडेकर, विद्याधर सावंत, सुनिता रामटेके यांचा सहभाग असणार आहे. या उपक्रमात याच महिन्यात दिवंगत झालेल्या पण नावलौकिक प्राप्त व्यक्तींला प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते‌. नरवीर तानाजी मालुसरे यांना हा  मान दिला जाणार आहे. त्यांच्याच वंशवेलीचे साक्षीदार असलेले पत्रकार आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष  रविंद्र मालुसरे त्यांच्या आठवणीना उजाळा देणारी आहेत.

हे सुद्धा वाचा

लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विसर्जन

मराठमोळी गायिका वैशाली माडेच्या जीवाला धोका

मिस्टर मम्मी या चित्रपटामध्ये दिसणार रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख

Isha Koppikar On Casting Couch In Bollywood, Says A ‘Hero’ Accused Of Infidelity Asked Her To Meet Alone & Then She Was Thrown Out

प्रत्येक महिन्याला एक अभिनव स्पर्धा घेण्यात येते यंदा चाळीसावी आजचे पाहुणे ही स्पर्धा अभिनेते, निवेदन दिनेश साळवी यांच्या स्मतीदिनचे निमित्त घेऊन आयोजित केली होती. निवेदक, लेखक नरेंद्र बेडेकर यांनी आपल्या परीक्षक जबाबदारीत या चार विजेत्यांची निवड केली असून त्याचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम याच सोहळ्यात होणार आहे. दिशा साळवी यांचे मार्गदर्शन लाभले असून मृण्मयी मोडक यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. असे निवेदन कलश्रमच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी