31 C
Mumbai
Thursday, May 11, 2023
घरक्राईमविद्यार्थ्याने वाहतूक पोलिसाला नेले एक किलोमीटरपर्यंत फरफटत

विद्यार्थ्याने वाहतूक पोलिसाला नेले एक किलोमीटरपर्यंत फरफटत

वसईत रविवारी एका बारावीतील विद्यार्थ्याने ४१ वर्षीय वाहतूक पोलिसाला आपल्या गाडीच्या बोनेटवरून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना घडली आहे. वसईतील गोलाई नका परिसरात मोटारसायकलस्वारांनी रास्ता अडवून अखेर त्याला गाडी थांबविण्यास भाग पाडले. बारावीत शिकणाऱ्या सर्वेश सिद्दीकीला (१९) पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केल्याप्रकरणी अटक केली आहे. यावेळी वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी यांना दुखापत झाली आहे. पण तरीदेखील या घटनेनंतर सोमवारी चौधरी पुन्हा कामावर रुजू झाले. (Cop dragged 1.5km on car bonnet teen driver nabbed)

ठाणे ग्रामीण पोलीस दलात २००७ साली चौधरी रुजू झाले होते. वसईतील वसंत नगरी सिग्नलनजवळ ते रविवारी सकाळी ९.०० वाजल्यापासून कार्यरत होते. सायंकाळी ७.१५ च्या सुमारास एका सफेद रंगाच्या गाडीने सिग्नल तोडला. चौधरी यांनी त्वरित रस्त्याच्या मधोमध उभे राहून सिद्दीकीला गाडी थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, सिद्दीलीने त्याकडे दुर्लक्ष केले आणि चौधरी यांना गाडीने धडक देण्याचा प्रयत्न करत तेथून पोबारा केला. पण चौधरी यांनी अत्यंत धाडसाने सिद्दिकीच्या गाडीच्या बॉनेटवर उडी मारली. त्यावेळीदेखील सिद्दीकीने गाडी न थांबवता चौधरी यांना एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले.

अखेर मोटारसायकलस्वारांनी आपल्या मोटारसायकल रस्त्याच्या मध्ये उभ्या करून सिद्दीकीला गाडी थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला तेथे जमलेल्या मोटारसायकलस्वारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. सिद्दीकी याची चौकशी केली असता त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याचे उघडकीस आले. याबाबत चौधरी यांनी सांगितले की, माझ्या नशिबाने मी बचावलो. माझी पकड जर ढिली पडली असती तर मी गाडीखाली आलो असतो. सिद्दीकी हा दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

बीबीसी कार्यालयांवर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीमागे मोदींचा हात?

महिलांच्या घोळक्याला धडक, पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव गाडीने ५ महिलांना चिरडले: चालक फरार

VIDEO : रेल्वे रुळांमध्ये आणि भोवती खडी का असते जाणून घ्यायचेय…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी