30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्राईमसोशल मीडियावर पैशांचे ज्ञान पाजळणाऱ्या सहायक फौजदाराला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

सोशल मीडियावर पैशांचे ज्ञान पाजळणाऱ्या सहायक फौजदाराला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

हल्ली तत्त्वज्ञान शिकविणाऱ्या स्वयंघोषीत मोटिवेशनल स्पिकर्सची मोठी जमात समाजमाध्यमांमध्ये दिसते. यामध्ये सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा देखील मोठा भरणा दिसून येतो. अशाच एका सहायक फौजदाराचा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भांडाफोड केला आहे. लाच घेताना त्याला रंगेहात पकडले आहे. त्यानंतर त्याची सोशल मीडियाव केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

कोल्हापूर पोलीस दलात असणारा सोमथान देवराम चळचूक (वय 48 रा. जयसिंगपूर) याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्याने जप्त केलेले वाहन परत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून 10 दहा हजार रुपयांची लाच घेणे या महाशयांना चांगलेच महागात पडले आहे. तक्रारदाराने फायनान्सचे कर्ज घेऊन कार खरेदी केली होती. त्यानंतर ती कार त्याने आपल्या मित्राला विकली, मात्र या वाहनाच्या कर्जाचा हप्ता न भरता आल्याने तक्ररदाराने पोलिसांकडे धाव घेत आपले वाहन परत मिळावे यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर चळचूक याने तक्रारदाराला 15 हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार व्यक्तीने चळचूकविरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे हे भाजपने पाळून ठेवलेले पोपट : संजय राऊत

दुसरं लग्न करण्यासाठी वडिलांनी केली दोन वर्षांच्या मुलाची हत्या

कोण संजय राऊत? अजित पवार यांचा संतप्त सवाल

सहायक फौजदार चळचूक याने 28 डिसेंबर 2022 रोजी समाज माध्यमांवर 84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही, मात्र माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही? अशी पोस्ट केली होती. चळचूक याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर त्याची पोस्ट आता व्हायरल होत असून त्याची खिल्ली उडवली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी