30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयपर्यटनप्रेमींना रोहित पवार बोलवतायत कर्जत-जामखेडमध्ये

पर्यटनप्रेमींना रोहित पवार बोलवतायत कर्जत-जामखेडमध्ये

टीम लय भारी

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित(Rohit Pawar) पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड येथील पर्यटन प्रकल्पाबद्दल माहिती देणारा व्हिडिओ ट्विटरवर प्रदर्शित केला आहे(Rohit Pavar has posted a video on Twitter giving information about his Karjat-Jamkhed tourism project).

या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः कर्जत-जामखेडचे धार्मिक, सांस्कृतिक, प्राचीन, नैसर्गिक सौंदर्य, येथील खाद्य संस्कृती जगासमोर आणण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. ह्या प्रकल्पाविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत ते त्यांच्या पर्यटन प्रकल्पाच्या युट्यूब चॅनेलचा प्रचार करत आहेत.

शेतकऱ्याला दोन एकर गांजा पिकवायचा आहे, सरकारकडे मागितली परवानगी

तालिबानने अक्कल पाजळली, भारताला दिला फुकटचा सल्ला

 

सर्वांना कर्जत-जामखेडचे नाव ऐकले की, तिथले मतदान आणि राजकारणच आठवते. परंतु रोहित पवार बोलतायत की, ह्या गोष्टी आता जुन्या झाल्यात. कर्जत-जामखेड मध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात. कर्जत जामखेड मध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या पर्यटकांनी आवर्जुन बघितल्याच पाहिजेत.

अनिल परब यांच्यावर सीबीआय चौकशी लावावी – आशिष शेलार

Rohit Pawar: ‘राज्यपाल ‘ही’ यादी मंजूर करतील, कारण…’; रोहित पवार यांचं ट्वीट चर्चेत

इथल्या भूमीत ताकद आहे. ह्या मातीत अनेक संत होऊन गेले. प्राचीन मंदिरे, नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे आहेत. अभयारण्य आहेत, खाद्यसंस्कृती उत्कृष्ट आहे. हे सारे पाहण्यासाठी पर्यटकांना कर्जत-जामखेड मध्ये आकर्षित केले जात आहे. कर्जत जामखेड हे उत्तम पर्यटन स्थळ बनवण्यात आले आहे. कर्जत-जामखेड येथील पर्यटनात नक्की काय आहे, हे प्रेक्षकांना आता युट्यूब वर बघायला मिळणार आहे.

Rohit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड येथील पर्यटन प्रकल्पाबद्दल माहिती देणारा व्हिडिओ ट्विटरवर प्रदर्शित केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी