32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeएज्युकेशनएनआयटीमध्ये चांगल्या रँकिंगसाठी विद्यार्थ्यांकडून 12 ते 13 लाख रुपयांची मागणी, सीबीआयने केला...

एनआयटीमध्ये चांगल्या रँकिंगसाठी विद्यार्थ्यांकडून 12 ते 13 लाख रुपयांची मागणी, सीबीआयने केला पर्दाफाश

टीम लय भारी

नवी दिल्ली : एनआयटी सारख्या संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल १२ ते १३ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. जेईई मेन परीक्षेत रँकिंग मिळवून देण्यासाठी ही टोळी विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यायची. या प्रकरणी सीबीआयने १९ ठिकाणी छापे टाकले आहे. या प्रकरणी १ सेप्टेंबरला एफआयआर दाखल करण्यात आला होता (CBI has busted a gang demanding lakhs for admission in an institution like NIT).

जेईई मेन परीक्षेत कमी रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना गाठून दलाल त्यांच्यांकडून पैसे उखाळ्याचे आणि एनआयटीमध्ये नाव नोंदवून देऊ असे आश्वासन द्यायचे. नोएडातील एफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे संचालक या टोळीचे मुख्य होते. एफिनिटीच्या संचालकांनी हरियाणा येथील सोनीपतमधील एका परीक्षा केंद्रातील काही कर्मचाऱ्यांशी साटेलोटे केले होते. परीक्षेत घोटाळा करण्यासाठी विद्यार्थ्यांना हेच परीक्षा केंद्र निवडण्यास सांगितले जायचे. अशी माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राणेंचा भंपकपणा, ‘मोदी एक्स्प्रेस’च्या नावाने गणेशभक्तांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती घडवा!

CBI busted gang demanding lakhs for admission in NIT
सीबीआयने १९ ठिकाणी छापे टाकले

या परीक्षा केंद्रात सामील असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित विध्यार्थ्याच्या कम्पुटरचा रिमोट कंट्रोल घेऊन दूर कुठे तरी शिक्षित व्यक्तीला तो रिमोट द्यायचे व ती शिक्षित व्यक्ती त्या विद्यार्थ्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची.

‘राजेश टोपे यांना राज्यात फिरू देणार नाही’

NIT Andhra Pradesh Commences Physical Classes for MTech Students

या प्रकरणी सीबीआयने १९ ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये दिल्ली, पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर, एनसीआर, आणि इंदुर यासारख्या राज्यांचा समावेश आहे. या प्रकरणात छापे मारण्यासाठी सीबीआय जेईई मेनच्या चौथ्या टप्यातील परीक्षा होण्याची वाट बघत होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी