32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeएज्युकेशनमुंबई विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील करणार पाठपुरावा

मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील करणार पाठपुरावा

राज्यामध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या प्रभावी धोरणाची अंमलबजावणी केली आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री, नीती आयोग, युजीसी, नॅक यांच्याशी समन्वय करून राष्ट्रीय पातळीवरील नवी दिल्लीमध्ये कार्यशाळा होणार असून ती मुंबईमध्ये देखील व्हावी, यासाठी चंद्रकांत पाटील मान्यवर आणि नेत्यांशी संपर्कात राहून पाठपुरावा करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेले निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत आदेश दिले आहेत.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘सध्या राज्यात २०० महाविद्यालयांमध्ये भारतीय आयकेएस (UKS) सुरू असून त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. धोरणाच्या अंमलबाजावणीमध्ये स्पष्टता यावी. यासाठी नीती आयोगाने कार्यगट करून पाठपुरावा करावा. मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत शैक्षणिक योजना, शैक्षणिक माहिती, शैक्षणिक उपक्रम अभ्याससत्राच्या माहितीचे प्रदर्शन भरवण्यात यावं. यासाठी शासकीय आणि नामांकीत खासगी विद्यापीठांनी विविध कार्यशाळा उभारावी’.

हे ही वाचा

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी सुरू

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालत्तेच्या लिलावात ‘कशाची’ बोली?

६.५ कोटी रूपयांचं खानपानाचं बिल, सरकार कोणावर किती खर्च करतं?

सोशल मीडियाचा वापर वाढवण्याचं आवाहन

‘उच्च आणि तंत्रशिक्षणासाठी सध्या ज्या काही धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे. ती माहिती देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर करणं हे प्रभावी माध्यम असल्याने सोशल मीडियाचा वापर करावा’, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ‘वेबपोर्टल तात्काळ अपडेट करून घ्यावेत. राज्यातील विद्यापीठं, विविध प्रशिक्षणं, अभ्यासक्रम, योजना, उपक्रम, प्रयोग यांची माहिती विद्यापीठनिहाय घेता येणार आहे’.

‘सोशल मीडियामुळे देशातील विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यापीठाशी जोडला जाणार’

‘मराठी भाषेप्रमाणे हिंदी, इंग्रजी. तमीळ, गुजराती भाषांमध्ये देशातील विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यापीठांशी जोडला गेला जाईलं उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ट्विटर हॅंडेल उघडून आवश्यक असलेली माहिती वेळोवेळी शेअर कारावी’, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी