30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeएज्युकेशनअखेर ITI विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मिटला; मंगलप्रभात लोढा यांनी केली मोठी घोषणा

अखेर ITI विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मिटला; मंगलप्रभात लोढा यांनी केली मोठी घोषणा

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून दरमहा 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. वाढत्या महागाईच्या काळात हे विद्यावेतन अतिशय कमी आहे, असा मुद्या अनेकदा उपस्थित करण्यात आला होता. अखेर राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांसाठी असलेले विद्यावेतन हे 40 रुपयांवरून 500 रुपये करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

राज्यातील तरुणांना करिअरविषयक संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा मंगलप्रभात लोढा यांनी केली.

कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित केलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सुमारे तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. शिबिराच्या ठिकाणी विविध करिअर विषयक संधी, रोजगार-स्वयंरोजगार विषयक शासकीय योजना, देशातील आणि परदेशातील विविध शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कर्जविषयक योजना आदींची माहिती देण्यात आली. विशेषत: युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात 6 जूनपर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

आयटीआय कोर्सेसमध्ये बदल होणार
आयटीआयमधील कोर्सेस हे कालबाह्य झाले असून नवीन कोर्सेस बाबत सरकार पुढील वर्षी घोषणा करणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील 36 जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली असून प्रत्येक जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आवश्यक असणारे कोर्स घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा: 

मंगलप्रभात लोढा यांच्या विधवा नामकरण प्रस्तावाला महिला संघटनेचा आक्षेप

लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची घालावी; त्या प्रस्तावावरून सुषमा अंधारेंचे खडे बोल

शाळेत मराठी सक्तीबाबत राज्य सरकारचा यू-टर्न !

ITI Student Stipend, Mangalprabhat Lodha, ITI Student Stipend: ITI students will get a Stipend of 500 rupees per month; Mangalprabhat Lodha

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी