टीम लय भारी
मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देत पुर्वा वळसे पाटील यांनी आपल्या माता पित्यांचे तरूण वयातील फोटो जाहीर केले आहेत ( Dilip Walse Patil’s photo shared by Purva Walse Patil ).
पूर्वा यांनी ट्विटद्वारे एकूण चार फोटो शेअर केले आहेत. चारही फोटोंमध्ये दिलीप वळसे पाटील आपल्या पत्नीसोबत दिसत आहेत. त्यातील तीन फोटो तरूण वयातील आहेत.
Happy 36th wedding anniversary to my wonderful parents! 😊 pic.twitter.com/V4qaiyDH8D
— Purva Walse Patil (@PurvaWalsePatil) June 23, 2021
हे सुद्धा वाचा
WorkFromHome : दिलीप वळसे – पाटलांचे मतदारसंघात लक्ष; रस्त्यांसाठी १० कोटी मंजूर करून घेतले
मंत्रालयातील मलईदार पदांवर अधिकाऱ्यांचे बस्तान, दोन वर्षांपासून बदल्यांना मुहूर्तच नाही
‘माझ्या लोभसवाण्या माता पित्यांना 36 व्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशा भावना पूर्वा यांनी व्यक्त केल्या आहेत ( Purva Walse Patil wished to Dilip Walse Patil for marriage anniversary ).
पूर्वा यांनी केलेल्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनीही वळसे – पाटील दांपत्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.