टीम लय भारी
मुंबई: बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या कुटुंबासहित भारत देश सोडून जाणार आहे. तो व त्याच्या कुटुंबातील सदस्य दुबईला शिफ्ट होण्याची तयारी करत आहेत. (Nawazuddin Siddiqui is preparing to leave India with his family and shift to Dubai.)
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्यांच्या दुबईला शिफ्ट होण्याच्या बातमीला दुजोरा दिला. ती म्हणाली , हो हे खरे आहे की , आम्ही दुबईला राहायला जात आहोत. आमची दोन्ही मुले शोरा आणि यानी हे दुबईलाच राहतील व तिथूनच पुढचे शिक्षण देखील घेतील. भारतात सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आम्हाला वाटते की अजून काही वर्षे भारतात हे असेच शिक्षण सुरू राहील. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना दुबईच्या शाळेत दाखल केले आहे. ऑनलाईन शिक्षण हे योग्य नाही आणि त्यात मुले नीट अभ्यास करू शकत नाही. वर्गातील शिक्षण हे पूर्णपणे वेगळे असते. म्हणून आम्ही लवकरच दुबईला जाण्यासाठी तिकीट मिळवणार आहोत. (In an interview to the Times of India, Nawazuddin’s wife Alia confirmed the news of his shift to Dubai.)
इस्राईलच्या राष्ट्रगीताची धून चोरण्याच्या आरोपावरून अनु मलिक होतोय ट्रोल
रोहित पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर साधला निशाणा
“आमचा सीएम जगात भारी”, मुख्यमंत्र्यांवर मनसेचा खोचक पण मजेशीर टोला
भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; असा मिळवला विजय
नवाजुद्दीनच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण
पत्नी आलिया व मुले यांना दुबईला सोडल्यावर नवाझुद्दीन काही दिवसांत लंडनला रवाना होणार आहे. तो हिरोपंती -२ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ( Navazzuddin Siddiquie is going to London for the shooting of Hiropanti-2.)
सध्या नवाज आपल्या कुटुबियांसोबत आनंदी आहे. नवाज त्याची पत्नी आणि मुलांसमवेत कसारा येथील त्याच्या फार्महाऊसवर आहेत.