28 C
Mumbai
Saturday, June 22, 2024
Homeमनोरंजन'या'कारणासाठी नयनतारा म्हणाली थँक्स कतरिना !

‘या’कारणासाठी नयनतारा म्हणाली थँक्स कतरिना !

अभिनेत्री कतरीना कैफ आणि नयनतारा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहेत. नयनतारा शाहरुखसह जवान चित्रपटातून हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण करत आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर्समधील अत्याधुनिक व्हीएफएक्स आणि फायटिंग सीन्स पाहून सर्वांनाच चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरता लागून राहिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून कतरिनाही भारावली. ‘अरे वा! काय ट्रेलर आहे!!’ या शब्दात कतरीनानं ‘जवान’ चित्रपटाचं कौतुक केलं.
 कतरीनानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये अभिनेता शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती आणि दिग्दर्शक अटली यांना टॅग करत चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. नयनतारानं मैत्रीण कतरीनाची स्टोरी स्वतःच्या अकाउंटवरील स्टोरीमध्ये रिपोर्ट करत तिला धन्यवाद दिले. नयनतारा आणि कतरीना जुन्या मैत्रिणी आहेत. कतरिनानं 2019 साली ‘के ब्युटी कतरीना’ हा सौंदर्य प्रसाधनांचा ब्रँड सुरु केला. नयनतारानं ‘के ब्युटी कतरीना’साठी ब्रँड फोटोशूट केलं होतं. फोटोशूट दरम्यान कतरीना आणि नयनताराची मैत्री घट्ट झाली.

नयनतारानं तीन दिवसांपूर्वीच इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आगमन केलं. सहसा नयनतारा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहभाग घेत नाही. सोमवारी चक्क बादशाह शाहरुख खान चेन्नईत ‘जवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजर राहिला होता. नयनतारा चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमापासून दूरच राहिली. नयनताराच्या गैरहजरीबद्दल चर्चा सुरु असताना दुसऱ्याच दिवशी तिनं इंस्टाग्राम अकाउंट सुरू केलं. दोन दिवसातच नयनताराला एक लाख 90 हजार फॅन फॉलोईंग मिळाली.

हे सुद्धा वाचा 

एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

 इंस्टाग्रामवर येताच नयनतारानं अभिनेता शाहरुख खान, दिग्दर्शक अटली आणि संगीतकार अनिरुद्धला फॉलो केलं. नयनतारा मिशेल ओबामा, अभिनेत्री जेनिफर लूप्स, प्रियांका चोप्रा अनुष्का शर्मा आलिया भट आणि दीपिका पादुकोण, समंथा,तापसी आणि कटरीना कैफ ला फॉलो करतेय. ‘जवान’ सिनेमाची क्रेझ पाहता नयनताराचा इंस्टाग्रामवरील फॅन फॉलोविंग मोठ्या संख्येने वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी