32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रदोन लाचखोर वनाधिकाऱ्यांच्या हातात बेड्या

दोन लाचखोर वनाधिकाऱ्यांच्या हातात बेड्या

टीम लय भारी

पनवेल : पनवेलच्या वनक्षेत्र विभागात सरास जमीन खरेदी-विक्री व भाड्याने देण्याचे बेकायदेशीर व्यवहार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी वनक्षेत्रात केलेल्या अतिक्रमणानंतर लाचेची मागणी करून कारवाई न करणाऱ्या दोन वनरक्षकधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे (Forest Officials Handcuffs in the hands of two corrupt).

पनवेलमधील आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जागा भाड्याने देण्याचे बेकायदेशीर व्यवहार पनवेलमध्ये जोरदार सुरू आहेत. मागील दहा वर्षांत आदिवसींच्या ताब्यातील जमिनीवर घरे बांधून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

लाचखोर तहसीलदारास रंगेहात पकडले

लाचखोर महिला प्रांताधिकारी एसीबीच्या जाळ्यात

शिरवली ग्रामपंचायतीसह खैरवाडी, मोर्बे, वाजे, नेरे, मालडुंगे, धोदाणी या परिसरात सरास असे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जरी भाड्याची घरे असली तरी त्यामध्ये वीजपाणी आणि घरपट्टी भाडेकरूच्या नावाने मिळत असल्याने अनेकांनी त्यांची ‘सेकंड होम्स’ची स्वप्ने याच ग्रामीण पनवलेमध्ये पूर्ण केली आहेत.

आदिवासींना मिळालेल्या दळी जमिनी व हक्क जमिनीच्या क्षेत्रात बहुतांश ही ‘सेकंड होम्स’ची स्वप्ने याच ग्रामीण पनवलेमद्ये पूर्ण केली आहेत. आदिवासींना मिळालेल्या दळी जमिनी व वन हक्क जमिनीच्या क्षेत्रात बहुतांश ही सेकंड होम्सची भाड्याची घरे उभारल्याने वन विभागाकडून या भाडेकरांना कारवाईचा धाक दाखवून पैसे उकळले जात असल्याचा अनेक तक्रारी दोन वनरक्षकांच्या लाचखोरीच्या तक्रारीनंतर चर्चेत आल्या आहेत.

लाचखोर महिला प्रांताधिकारी एसीबीच्या जाळ्यात

“Not Anti-Hindu, Anti-Corona”: Uddhav Thackeray To “Irresponsible” BJP

नागरिकांनी वन जमिनी किंवा घर भाड्याने घेतल्याचे समजल्यावर तेथे असलेल्या वन जमिनीवर घर बांधले किंवा घराचे काम सुरू असाना वनरक्षक तेथे येतात. वन विभागातर्फे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. तसेच जेवढी नावे आदिवासी बांधवांसोबत करारपत्रात दिली आहेत त्याच नावांच्या प्रति ४० हजार रुपयांचा दर वन विभागाच्या दुकलीने ठरविला होता. यावर देखरेखीसाठी सुमारे ७० हून अधिक कर्मचारी या वनक्षेत्र विभागात तैनात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी