33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ९०० पदांसाठी मेगाभरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ९०० पदांसाठी मेगाभरती

टीम लय भारी
 
मुंबई: MPSC च्या परिक्षेसाठी इच्छुक उमेद्वारांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २०२१ ची मेगाभरती. ही भरती तब्बल ९०० पदांसाठी आहे. एमपीएससीने उमेदवारांना ही खुशखबर देत ‘गट क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठीच्या ९००  पदांसाठीच्या या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळांवर याबद्दल माहिती दिली आहे. M(Good News : MPSC Commission recruitment for 900 posts)

या भरती मध्ये मराठी लिपिक-टंकलेखकसाठी ४७३ पदे(Marathi Clerk typist ), इंग्रजी लिपिक-टंकलेखकसाठी ७९ पदे (English Clerk Typist), कर सहाय्यक (गट क) साठी ११७ पदे(Tax Assistant(group c)),  तांत्रिक सहाय्यक (गट क) साठी १४ पदे(Technical Assistant), उद्योग निरिक्षक (गट क) साठी १०३ पदे(Industry inspector (group c)), तर दुय्यम निरिक्षक (गट क) पदासाठी ११४(Secondary inspector (group C)) या जागांचा समावेश आहे. या पदांमध्ये वित्त विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग व सामान्य प्रशासन विभागातील जागांचा समावेश आहे.

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

मुंबई महानगरपालिकेत पदवीधारकांना नोकरीची संधी

या पदांसाठी उमेद्वारांना १०० गुणांची एका तासाची बहुपर्यायी पूर्व परीक्षा द्यावी लागेल. या परिक्षेच्या निकालातून मुख्य परिक्षेसाठी सक्षम उमेद्वारांची निवड केली जाईल. ही परीक्षा ३ एप्रिल २०२२  रोजी घेतली जाईल.

व या परीक्षेसाठी उमेदवाराना अर्ज भरावे लागतील. हे अर्ज २२ डिसेंबर २०२१ पासून  ते ११ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. या परिक्षेसाठी शुल्क मागास प्रवर्गांसाठी ३९४ रूपये तर मागासवर्गीय व अनाथांसाठी २९४ रूपये असेल. परिक्षेबाबत अधिक माहिती MPSC च्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर मिळेल.

MHADA Recruitment 2021 : लिपिक, अभियंतासह इतर ५३५ पदांसाठी भरती, १४ ऑक्टोबर अर्जाची शेवटची तारीख

State Bank of India (SBI) Recruitment 2021: Bumper vacancies announced at sbi.co.in, check important details

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी