33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांनी नांगी टाकली आहे का ?, गोपीचंद पडळकरांचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी नांगी टाकली आहे का ?, गोपीचंद पडळकरांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षणावरून पडळकरांनी मुख्यमंत्र्यांनी नांगी टाकली आहे का? असा सवाल केला आहे (Gopichand Padalkar attacks Chief Minister Uddhav Thackeray).

महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही आहे. हे त्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध होत आहे असे पडळकर म्हणाले. शासनाच्या मूळ प्रस्तावात विधी व न्याय विभागाने स्पष्ट नमूद केले आहे की, अध्यादेश काढण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना मला विचारायचे आहे की, त्यांना त्यांच्या शासनात काय चालू आहे याचा सुगावा नसतो का? किंवा त्यांना विभाग प्रमुखांशी सवांद साधायला वेळ नसतो? असा सवाल गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

त्याचबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक करण्यात आली होती, हे मुख्यमंत्र्यांना माहित नसते. तसेच ओबीसींच्या राजकीय अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाच्या प्रस्तावात असलेल्या त्रुटी ही मुख्यमंत्र्यांना माहित नाही का? असे म्हणत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा

Maharashtra: BJP plays north Indian card by fielding Sanjay Upadhyay for Rajya Sabha bypoll

राज्याच्या निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणशिवाय पाच जिल्हा परिषदेतील निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अध्यादेश काढल्यानंतर काही ठिकाणी 27 टक्के, तर काही ठिकाणी 20 टक्के आणि 4 टक्के आरक्षण मिळेल. असे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी