28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीययवतमाळमधील 'ही' घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी : गोपिचंद पडळकर

यवतमाळमधील ‘ही’ घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी : गोपिचंद पडळकर

टीम लय भारी 

यवतमाळ :  महागाव तालुक्याच्या माळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावत मोठ्या प्रमाणात पारधी समाज बांधव राहत आहेत. गावकऱ्यांच्या अत्याचाराला कंटाळून गावातील ६० पारधी कुटूंबांनी गाव सोडून दिले. या प्रकरणावर आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ही धक्कादायक घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी, असा घणाघात केला आहे.(Gopichand Padalkar’s criticis on Maha Vikas Aghadi)

पारधी समाजाच्या माजी सरपंचासकट 60 कुटुंबावर गाव सोडून जंगलात जाण्याची वेळ आली. यवतमाळच्या माळवागद गावातली ही घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी आहे. बहुजन आदिवासींवर एवढा आकस कशाचा? पारधी महिलांवर अत्याचार झाले. वारंवार तक्रारी केल्या तरी कारवाई नाही, असे ट्विट गोपिचंद पडळकर यांनी केले आहे.

पिढ्यानं पिढ्या उध्वस्त झाल्या. कोतवालच कसाई झाले पारधी समाजानं न्याय मागायचा तरी कुणाकडं? असा, सवाल गोपिचंद पडळकर यांनी सरकारला विचारला आहे.

…म्हणून पारधी समाजाच्या ६० कुटूंबांनी गावं सोडलं

या पारधी महिलांना गावातील अनेक दारुड्यांनी त्रास देण्याचा प्रकार वाढत चालला होता.याशिवाय आरक्षणामुळे पारधी समाजाच्या एका व्यक्तीकडे सरपंच पद आले होते मात्र, त्याला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली.त्यामुळे एक महिन्यपूर्वी या लोकांनी माळगाव सोडून दिले आणि या गावापासून दोन किलोमीटरवर जंगलात पाझर तलावाच्या बाजूला झोपड्या बांधून राहत आहेत. याबाबतची माहीती समजताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी भेट देऊन पारधी महिलांशी संवाद साधला.


हे सुद्धा वाचा : 

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत केला गनिमी कावा अन्….

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी