36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात तुमचा पण मेकअप वितळतो का? मग आजच फॉलो करा 'या' टिप्स

उन्हाळ्यात तुमचा पण मेकअप वितळतो का? मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

मार्च महिना संपत आला असून आता उन्हाळा (Summer) चांगलाच तपायाला लागला आहे. उन्हाळाच्या दिवसांमध्ये कार्यक्रम देखील जास्त प्रमाणात असतात. आता लग्न असो कि कुठला अन्य कार्यक्रम, महिला विना मेकअप जातच नाही. मात्र, उन्हाळा आणि त्यामुळे येणाऱ्या घामामुळे अनेकदा मेकअप वितळुन जातो. (Summer Beauty Tips avoid melting makeup in summer) त्यामुळे अनेक महिला खूप जास्त मेकअप करतात. पण अतिशय जास्त मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावर डाग , मुरुम येण्याची शक्यता जास्त असते. (Summer Beauty Tips avoid melting makeup in summer) 

आता घरीबसल्या बनवा नैसर्गिक ब्लश, तुमची त्वचा राहणार निरोगी

उन्हाळा म्हटलं की घाम येणारच. मात्र आपल्या घाम आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. सूर्याच्या किरणांपासून आपल्या त्वचेला वाचवण्यासाठी काही महिला दररोज मेकअप करूनच घराच्या बाहेर निघतात. सूर्यप्रकाश आणि घामामुळे मेकअप पॅचमध्ये बदलतो. (Summer Beauty Tips avoid melting makeup in summer) उन्हाळ्यात घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी थांबवता येत नाही. पण मेकअप करताना काही सोप्या टिप्स पाळल्या तर मेकअप वितळण्यापासून रोखू शकतो. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्ट टिप्स सांगणार आहोत. (Summer Beauty Tips avoid melting makeup in summer)

जाणून घ्या, कडक उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

  • उन्हाळ्यात बहुतेक लोक त्यांच्या त्वचेला मॉइश्चरायझ करत नाहीत. अशा स्थितीत चेहऱ्यावर जास्त घाम येणे सुरू होते, तर त्यामुळे मेकअप वितळण्याची समस्या वाढू शकते. म्हणून, जेव्हा तुम्ही मेकअप लावत नाही, तेव्हा त्वचेला मॉइश्चरायझ करण्याची खात्री करा.
  • उन्हाळ्यात तुमचा मेकअप खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर यासाठी योग्य प्राइमर वापरा. तुमच्या चेहऱ्याच्या मेकअपमध्ये तेल संतुलित ठेवण्यासाठी एक चांगला प्राइमर काम करतो. यावेळी तुम्ही तेलकट त्वचेसाठी बनवलेले प्राइमर वापरू शकता.

    शिळी चपाती खाण्याचे फायदे वाचाल, तर फेकण्याआधी नक्की विचार कराल

  • उन्हाळ्यात हलके फाउंडेशन वापरणे योग्य मानले जाते. जर तुम्ही हेवी फाउंडेशन वापरत असाल तर ते त्वचेचा ऑक्सिजन लॉक करते. त्यामुळे छिद्रांमध्ये जास्त घाम येऊ लागतो आणि मेकअप वितळण्याची शक्यता वाढते.
  • उन्हाळ्यात पावडरसह मेकअप सेट करणे खूप महत्वाचे आहे. तुमचा फाउंडेशन आणि कन्सीलर सेट करण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध पावडर वापरू शकता.
  • उन्हाळ्यात मेकअप वापरत असाल तर वॉटर प्रूफ उत्पादने वापरा. बाजारातील मेकअप किटमध्ये समाविष्ट असलेली बहुतांश उत्पादने वॉटरप्रूफ असतात. ही उत्पादने मेकअप वितळण्यापासून रोखतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी