35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रअक्षय कुमारला पुन्हा कोरोनाचा फटका! ‘पृथ्वीराज’ ट्रेलर लांबणीवर!

अक्षय कुमारला पुन्हा कोरोनाचा फटका! ‘पृथ्वीराज’ ट्रेलर लांबणीवर!

टीम लय भारी

 मुंबई : या वर्षाच्या सुरुवातीला सुपरस्टार अक्षय कुमारचा (Akshay kumar) ‘बेलबॉटम’ रिलीज झाला. त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये 50 टक्के लोकांनाच एंट्री होती आणि महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. यानंतर अभिनेत्याचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. नुकताच या अभिनेत्याचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.( Akshay Kumar hits by Corona Prithviraj’ trailer postponed!)

अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. हा ऐतिहासिक चित्रपट 21 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे. हा पुढच्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा ट्रेलर 27 डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र, आत तो पुढे ढकलण्यात आला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, पृथ्वीराजचा टीझर 15 नोव्हेंबरला रिलीज झाला आणि त्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. टीझरमध्ये कथा आणि सेट याशिवाय व्यक्तिरेखाही दाखवण्यात आल्या आहेत.

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान!

राधा आमच्यासाठी पूज्यनीय, सनीचा डान्स अश्लील; मथुरेतील संतांचा ‘मधुबन’ गाण्याला विरोध

 ट्रेलर रिलीज लांबणीवर!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा ट्रेलर 27 डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र, आता रिलीजच्या तारखा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सूत्राने पुढे सांगितले की, चित्रपटाचा ट्रेलर 2021 वर्ष संपण्यापूर्वी म्हणजे याच या आठवड्यात प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाचे निर्माते आणि यशराज फिल्म्स एक-दोन दिवसांत निर्णय घेतील आणि लवकरच घोषणा करतील.

कोरोनामुळे निर्बंध

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता अनेक राज्यांमध्ये रात्री कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अशीच प्रकरणे वाढत राहिल्यास इतर राज्यांमध्येही रात्रीचा कर्फ्यू वाढू शकतो. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवली जाऊ शकते. ट्रेंड तज्ज्ञांच्या मते, जर कोरोना प्रकरणे वाढत राहिली तर इतर राज्यांमध्येही रात्रीचा कर्फ्यू लावला जाईल. नवीन वर्षाच्या सुट्टीनंतरही रात्रीचा कर्फ्यू कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत बिग बजेट चित्रपटांना फटका बसू शकतो. पृथ्वीराजचे निर्मातेही याची विशेष काळजी घेत आहेत. हा चित्रपट 21 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या अक्षय त्याच्या कामातून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. कलाकार त्यांच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतात.

खुद्द सलमान खान म्हणाला, विषारी साप मला तीन वेळा चावला

From Shah Rukh Khan to Priyanka Chopra Jonas: This was the first salary of these 5 Bollywood actors and how much they earn now will leave you STUNNED!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी