29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO : दूध दराबाबत निर्णय घ्यावाच लागेल, पण... : बाळासाहेब थोरात

VIDEO : दूध दराबाबत निर्णय घ्यावाच लागेल, पण… : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये दुधाचे मागणी घसरली. त्यामुळे दरही घसरले. त्या अनुषंगाने आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. परंतु या परिस्थितीला केंद्रातील भाजपचे सरकार जबाबदार आहे ( Balasaheb Thorat attacks on BJP ), असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

राज्यात शेती व दुध क्रांती झाल्याचे दुधाचे उत्पादन वाढलेले आहे. पण ‘कोरोना’च्या संकटामुळे दुधाचे प्रमाण वाढले. या जादा दुधाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दररोज पाच लाख लिटर दुधाची पावडर तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही दुधाचे प्रमाण जास्त आहे. दुधाचे भाव घसरत आहेत. त्यामुळे काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल, असे थोरात ( Balasaheb Thorat said, Mahavikas Aghadi government will take decision on Milk price crisis ) म्हणाले.

पण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे लोक आंदोलन करीत आहेत. त्याचे आश्चर्य वाटते. मागील पाच वर्षांत भाजप सरकारच्या काळात दुध दरवाढीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय तुटपुंजी मदत दिली होती.

हे सुद्धा वाचा

Tit for tat : देवेंद्र फडणवीसांचा ‘हा’ आदेश त्यांनाच ठरला जाचक?

दूध दराबाबत उद्धव ठाकरे, अजितदादा, बाळासाहेब थोरात ‘महत्वाचा’ निर्णय घेणार

…तर शेतक-यांचे आंदोलन चिघळणार : राजू शेट्टी

सध्यस्थितीत भारतात व महाराष्ट्रात दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात आहे. असे असतानाही केंद्रातील भाजप सरकार हजारो टन दुधाची पावडर आयात करीत आहेत. खरेतर, आपली पावडर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत – बाळासाहेब थोरात

केंद्राच्या या धोरणामुळे आपल्या दुधाचे दर कमी झाले आहेत. दुध व दुध पावडरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णपणे केंद्रातील भाजप सरकर जबाबदार आहे. त्यामुळे आंदोलन करायचेच असलेल तर भाजपने केंद्र सरकार व स्वःपक्षाच्या विरोधात करावे असाही सल्ला थोरात यांनी दिला ( Balasaheb Thorat said, BJP must be agitate against it’s own party).

Mahavikas Aghadi

Laybhari appeal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी