33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपन्हाळगडाच्या पडझडीला केंद्र सरकार जबाबदार

पन्हाळगडाच्या पडझडीला केंद्र सरकार जबाबदार

टीम लय भारी 

कोल्हापूर : शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान कतृत्वाने पावन झालेल्या गडांपैकी एक गड म्हणजे पन्हाळगड होय. या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे. शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले खूपच जून झाले आहे. त्यापैकीच पन्हाळगड हा देखील प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याचा बुरुज कोसळला आहे. सुदैवाने किल्ल्यावर कोणीही पर्यटक नव्हते त्यामुळे जीवितहानी झाली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला ऐतिहासिक ठेवा असलेला हा किल्ला असून, तो नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या किल्ल्याला केंद्रीय पुरातत्त्व खात्याने पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी नेमला नसल्याने त्याची डागडूजी केली जात नाही. मात्र राज्य शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्याही सरकारने गड किल्ले संवर्धनाकडे लक्ष दिले नाही.

गडावर असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज कोसळला आहे. त्यामुळे लोखंडी जिना बंद करण्यास आला आहे. मात्र नागरिकांनी पर्यायी रस्ता शोधला असून, ते पन्हाळ गडावर येत आहेत. पन्हाळागड सवंर्धनासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली आहे.

किल्ल्याच्या तटबंदीचे काही बुरुज ढासळले आहेत. अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. संततधार पावसामुळे या किल्ल्याच्या चार दरवाजाला लागून असलेला भिंतीचा काही भाग कोसळला आहे. मागच्यावर्षी देखील याच जागेवरचा भाग कोसळला होता. मात्र निधी अभावी दुरुस्तीची कामे झाली नाही.

हे सुध्दा वाचा:

महाराष्ट्र सरकारची आणखी एक मोठी घोषणा

भारतात आढळला दुर्मिळ रक्तगट; जगात केवळ 9 जणांशीच होतो मॅच

राज्यात पावसाचा कहर, बळीराजा चिंताक्रांत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी