36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात १२-१३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता : हसन मुश्रीफ

महाराष्ट्रात १२-१३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता : हसन मुश्रीफ

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ ते १३ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते. पण लोकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र दोन दिवसांनी होईल, अशी शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या भीतीने गावी परतत असलेल्या परप्रांतीय कामगारांना महाराष्ट्रातच थांबण्याचे आवाहन केले. राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

नागपुरात पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती

एकीकडे लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूर गावी परतत असले तरी नागपुरातील काही कामगारांनी महाराष्ट्रातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, लॉकडाऊनच्या काळात जगण्यासाठी अन्नधान्य गोळा करण्यासाठी सध्या हे मजूर भटकंती करत आहेत. या मजुरांनी मंगळवारी प्रतापनगर भागात गर्दी केली होती. सध्या लॉकडाऊनच्या शक्यतेने मजुरांना फार काम मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या मजुरांना वणवण करावी लागत आहे.

मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार : अस्लम शेख

“महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकेच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असे मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

“गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावे लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी