30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रनवनीत राणा मागासवर्गीय आहेत का, छगन भुजबळांचा बोचरा सवाल

नवनीत राणा मागासवर्गीय आहेत का, छगन भुजबळांचा बोचरा सवाल

टीम लय भारी 

मुंबई: मी मागासवर्गीय महिला आहे. म्हनूण मला शिवसेना अपमानस्पद वागणुक देत आहे. माझ्याबदल खालच्या दर्जात बोलत आहे असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. या विधानावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणतात, सरकारमध्ये व पोलिसांत मागासवर्गीय नाहीत का? राणा मागासवर्गीय आहेत की नाही हा विषय तर न्यायालयात गेलेला आहे. खासदार नवनीत राणा  मागासवर्गीय आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. म्हणून हा विषय उच्च न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला आहे. Chhagan Bhujbal question Navneet Rana is backward class

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे मुंबई हायकोर्टाने जातप्रमाणपत्र 8 जून 2021 रोजी रद्द केलं. राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हायकोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्याता आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.

त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा : 

भाजपने स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करावी उगाच रडीचा डाव खेळू नये – छगन भुजबळ

Drugs will become sugar powder if Shah Rukh Khan joins BJP, says Maharashtra Minister

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी