30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रस्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री सहपत्निक झाले पंढरपूरला रवाना...

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री सहपत्निक झाले पंढरपूरला रवाना…

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही विठ्ठलाची पंढरपूर यात्रा ही साधेपणाने व कमी वारकऱ्यांच्या उपस्थित साजरी करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची महापुजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येते. याच निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सोबत पंढरपूरला रवाना झाले आहेत (Chief Minister Uddhav Thackeray left for Pandharpur with his wife Rashmi Thackeray).

मुख्य म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठी मुख्यमंत्री हे स्वतःगाडी चालवत आहेत. मातोश्री या त्यांच्या निवासस्थानावरून ते दुपारी २:३० च्या सुमारास निघाले. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस ही सुरक्षा असून त्यांच्या ताफ्यातील वाहनांची माहिती ही सोलापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. सतत मुसळधार असणाऱ्या पावसामुळे व खराब हवामानामुळे मुख्यमंत्री हे विमानाने न जाता रस्ते मार्गी जात आहेत.

माझ्या मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील; संजय राठोड

इंधनदर वाढीच्या विरोधात काँग्रेसकडून मोदी सरकारचा जाहीर निषेध

उद्या मंगळवारी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री पहाटे २:३० वाजता विठ्ठलाची महापूजा करतील. त्यांच्यासोबत वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई केशव कोलते हे महापुजेला बसतील. गेल्या २० वर्षांपासून ते मंदिरात विणेकरी म्हणून कार्यरत आहेत.

Chief Minister Uddhav Thackeray left for Pandharpur
रश्मी ठाकरे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबईत पावसाने घातले थैमान; लोकांचे जनजीवन विस्कळीत

Maharashtra chief minister Uddhav Thackeray drives to Pandharpur to take part in ‘Ashadhi Ekadashi’ puja

गेल्या वर्षीही उद्धव ठकरे यांनी स्वतः गाडी चालवत पंढरपूर गाठले होते. तसेच मंत्रालयात जाण्यासाठी ही ते स्वतः गाडी चालवतात (He drives himself to get to the ministry).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी